Chikungunya Virus|Ixchiq Vaccine DAINIK GOMANTAK
ग्लोबल

Chikungunya ला आता कायमचा बाय-बाय! Ixchiq लशीला मंजूरी, एकाच डोसने विषाणू होणार नष्ट

Chikungunya Virus: भारतात चिकनगुनियाची पहिली केस 60 वर्षांपूर्वी 1963 मध्ये नोंदवली गेली होती. तर, हा रोग जगात प्रथमच 1952 मध्ये टांझानियामध्ये आढळला होता.

Ashutosh Masgaunde

United States approves vaccine Ixchiq For Chikungunya Virus:

चिकुनगुनिया आजारापासून मुक्ती मिळवण्याच्या दृष्टीने एक मोठी बातमी आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी Ixchiq ही लस तयार केली आहे. ही जगातील पहिली लस आहे, जी चिकुनगुनिया विषाणूला निष्प्रभ करेल.

अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या लसीला मान्यता दिली आहे. हा विषाणू संक्रमित डासांद्वारे पसरतो, ज्याला अन्न आणि औषध प्रशासन (FDA) ने कोविड नंतरच्या जगासाठी एक प्रमुख आरोग्य धोका म्हटले आहे.

एफडीएने सांगितले की, युरोपियन बायोटेक कंपनी वॅल्नेव्हाने बनवलेली लस इक्सचिक या नावाने बाजारात उपलब्ध होईल. ही लस सिंगल डोसमध्ये आहे, म्हणजेच लसीचा एक डोस व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी आहे.18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना ही लस घेता येणार आहे.

भारतात चिकनगुनियाची पहिली केस 60 वर्षांपूर्वी 1963 मध्ये नोंदवली गेली होती. तर, हा रोग जगात प्रथमच 1952 मध्ये टांझानियामध्ये आढळला होता. त्याला ब्रेक ब्रेकिंग फिव्हर असेही म्हणतात.

2004 नंतर, याची प्रकरणे 60 देशांमध्ये नोंदवली गेली. ज्या एडिस डासामुळे डेंग्यू होतो त्याच एडिस डासामुळे चिकनगुनिया होतो. या विषाणूची लागण झाल्यावर ताप आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात.

जागतिक स्तरावर, गेल्या 15 वर्षांत चिकनगुनियाची 5 दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यूएस ड्रग रेग्युलेटरकडून Ixchiq ला देण्यात आलेली परवाणगी या आजाराच्या मुक्तीच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार आहे.

एफडीएने सांगितले की ही लस एकाच डोसमध्ये दिली जाते. उत्तर अमेरिकेत 3,500 लोकांवर या लशीच्या दोन क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या.

लसीचा परिणाम असा झाला की, लोकांना डोकेदुखी, थकवा, स्नायू आणि सांधेदुखी, ताप आणि मळमळ यापासून आराम मिळाला. फक्त दोघांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

चिकुनगुनियाशी संबंधित तथ्ये

  • चिकुनगुनिया हा अतिशय धोकादायक विषाणू आहे. तो ओळखणे कठीण आहे.

  • चिकनगुनिया आणि डेंग्यूची लक्षणे सारखीच असतात.

  • हा आजार एडिस डासाच्या चाव्यामुळे होतो, त्याची लक्षणे 10 दिवसांपर्यंत दिसत नाहीत.

  • ताप 7-14 दिवस टिकतो. रुग्णाला बरे होण्यासाठी 3-4 आठवडे लागतात.

  • ELISA आणि RT-PCR चाचण्यांनंतर चिकनगुनियाचे निदान होते.

  • तीव्र सांधे वेदना, ताप आणि लाल पुरळ ही या आजाराची लक्षणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT