United Nations Dainik Gomantak
ग्लोबल

United Nations: इस्रायलच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच UN बैठक, अमेरिकेने दिला पूर्ण पाठिंबा; इस्त्रायली लष्कर राफाह शहरात घुसले!

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील विनाशकारी युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर अधिक आक्रमकरित्या हल्ले करत आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील विनाशकारी युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर अधिक आक्रमकरित्या हल्ले करत आहे. काही दिवसांपूर्वी इस्त्रायलने गाझातील राफाह शहरावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यांदरम्यान, इस्रायलच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांमध्ये आतापर्यंत अनेक प्रस्ताव आणण्यात आले.

इस्त्रायली ओलीसांच्या सुटकेबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुरुवारी सुरक्षा परिषदेत या प्रस्तावावर चर्चा झाली. यावेळी हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांवर चर्चा झाली. गाझामध्येच या लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. इस्रायलचे (Israel) म्हणणे आहे की, सध्या हमासने राफाहमध्ये इस्त्रायली ओलिसांना ठेवले आहे. दुसरीकडे, इस्त्रायली सैन्य आणि त्यांचे कंमाडरही तिथेच उपस्थित आहेत. यामुळेच इस्रायली लष्कराने राफाहमध्ये कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत सुमारे 4 लाख लोकांनी राफाहमधून पलायन केले आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिकेच्या (America) प्रतिनिधी लिंडा थॉमस यांनी सांगितले की, ‘इस्त्रायली ओलिसांची सुटका होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.’ हमासने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक हल्ला केला, ज्यामध्ये 1200 इस्रायली मारले गेले. याशिवाय, 200 लोकांना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते. मात्र दोन्ही बाजूंच्या करारामुळे काही जणांची सुटका करण्यात आली. तरीही सुमारे 132 लोक अजूनही ओलीस आहेत.

इस्रायलने विचारले- ओलिसांची सुटका होईपर्यंत काय कारवाई करणार?

यूएनमधील इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी बैठकीत सांगितले की, आमचे 132 लोक अजूनही ओलीस आहेत. गुरुवारी सुरक्षा परिषदेने तीन प्रस्ताव मंजूर केले. यापैकी एक म्हणजे हमासने कोणत्याही अटीशिवाय सर्व ओलीसांची तात्काळ सुटका करावी. यावेळी इस्रायलचे प्रतिनिधी गिलाड एर्डन यांनी ओलिसांची सुटका होईपर्यंत कौन्सिल काय कारवाई करणार असा सवाल केला. तुम्ही हमासवर काही निर्बंध घातले आहेत का, असाही सवाल त्यांनी केला. या बैठकीत अमेरिका इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे दिसून आले.

अमेरिकेत प्रस्ताव मंजूर, बायडन सरकारला शस्त्रे पाठवावी लागणार

दरम्यान, अमेरिकन खासदारांनी एक प्रस्ताव मंजूर केला आहे, ज्यानुसार बायडन प्रशासनाला इस्रायलला शस्त्रे पुरवावी लागणार आहेत. यापूर्वी त्यांनी घोषणा केली होती की, आम्ही इस्रायलला बॉम्बचा पुरवठा थांबवत आहोत कारण ते राफाहमध्ये वापरले जाऊ शकतात. याशिवाय, गाझामध्ये पडलेले बहुतांश बॉम्ब तेच होते, जे इस्रायलला अमेरिकेकडून मिळाले होते, अशी कबुलीही बायडन यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तुला लाज वाटत नाही का, आतंकी...'; मुस्लिम विद्यार्थ्यावर डाफरणाऱ्या प्राध्यापकाचा अजब अवतार; बंगळुरुतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Curchorem: शोषणकर्त्यांना संरक्षण कशाला? काँग्रेसचा सवाल; कुडचडेतील लैंगिक शोषण प्रकरणाचा पणजीत निषध

Crime News: वासनेच्या भरात अभिनेत्याचं क्रूर कृत्य! मोलकरणीचा शरीर संबंधास नकार; नराधमानं पोट, छाती आणि गळ्यावर वार करत केली हत्या

Show of Strength: अंतर्मनातील बंधमुक्ती! महिला कलाकारांच्या प्रभावी कलाकृती; ‘शो ऑफ स्ट्रेंथ’

Asaduddin Owaisi On Dhurandhar 2: 'मुसलमानांना शिव्या देणे गरजेचे आहे का?' ओवैसींचा 'धुरंधर 2' वर हल्लाबोल; चित्रपटाला म्हणाले 'बकवास'!

SCROLL FOR NEXT