Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाण मुलींना शाळेतून काढू नका, युनिसेफचे तालिबानला आवाहन

अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Education) सर्व माध्यमिक शाळा शनिवारपासून सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु त्यात मुलींनी शाळेत जाण्याविषयी अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

दैनिक गोमन्तक

युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF) ने शनिवारपासून अफगाणिस्तानमधील (Afghanistan) शाळा पुन्हा सुरु होण्याचे स्वागत केले, परंतु मुलींना वर्गाबाहेर ठेवू नये असा आग्रह धरला आहे. खरं तर, तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयाने (Ministry of Education) सर्व माध्यमिक शाळा शनिवारपासून सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु त्यात मुलींनी शाळेत जाण्याविषयी अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

रिपोर्टनुसार, तालिबान्यांनी (Taliban) शाळा पुन्हा सुरु करण्याच्या घोषणेत फक्त मुलांनाच शाळेत परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुलींच्या परत येण्याच्या तारखेचा उल्लेख अद्याप करण्यात आलेला नाही. काबुलमध्ये सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात हे पाऊल आहे.

फोर ने सांगितले, 'मुलींच्या प्रगतीमध्ये कोणत्याही स्वरुपाचा अडथळा येऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हे महत्वाचे आहे की, मुली कोणताही विलंब न करता त्यांचे शिक्षण पुन्हा सुरु करु शकतात. यासाठी आम्हाला पुन्हा अध्यापन सुरु करण्यासाठी महिला शिक्षकांची गरज आहे. अफगाणिस्तान सरकार पडल्यानंतर तालिबानने गेल्या महिन्यात अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा मिळवला. तेव्हापासून अशी चिंता होती की, ते इस्लामिक कायदा (Islamic law) पुन्हा लागू करतील जे मुलींना शाळेत जाण्यापासून रोखतात.

युनिसेफच्या मते, देशातील शिक्षण क्षेत्रात गेल्या दोन दशकांत लक्षणीय प्रगती झाली आहे. शाळांची संख्या तिप्पट झाली. शाळेतील मुलांची संख्या 10 लाखांवरुन 95 लाखांवर गेली आहे. फोरच्या नेतृत्वाखालील यूएन एजन्सीने विकास भागीदारांना अफगाणिस्तानमधील सर्व मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

Illegal Construction: बेकायदा बांधकामप्रकरणी म्हापसा पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना अवमान नोटीस; 15 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

POCSO Accused Death: मेरशी न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारलेल्या पॉक्सो आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

Hospital Infrastructure: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून 'आप' आक्रमक; आरोग्य सुविधा सुधारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT