Putin's secret girlfriend News, Underground Petition of 3 countries to find Vladimir Putin girlfriend Dainik Gomantak
ग्लोबल

अंडरग्राउंड! पुतिन यांच्या गर्लफ्रेंडला शोधायला 3 देशांची याचिका

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सीक्रेट गर्लफ्रेंडची सध्या खूपच चर्चा रंगत आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया-युक्रेन (Russia-Ukraine War) युद्धादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या सीक्रेट गर्लफ्रेंडची सध्या खूपच चर्चा रंगत आहे. पुतीन यांची कथित गर्लफ्रेंड आणि माजी जिम्नॅस्ट (Gymnast) अलिना काबाएवा (Alina Kabaeva) युक्रेन युद्धादरम्यान अंडरग्राउंड झाली आहे. काही रिपोर्ट्समध्ये ती स्वित्झर्लंडमध्ये लपली असल्याचेही दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत रशिया, युक्रेन आणि बेलारूसमधील सुमारे 50 हजार लोकांनी अलिनाविरोधात ऑनलाइन पिटीशन सुरू केले असून, तिला स्वित्झर्लंडमधून () बाहेर काढण्याची मागणीही केली आहे. (Underground Petition of 3 countries to find Vladimir Putin girlfriend)

अलिना एक रशियन राजकारणी, मीडिया मॅनेजर तसेच रिटायर्ड रिदमिक जिम्नॅस्ट आहे. अलिना ही आतापर्यंतची सर्वात यशस्वी जिम्नॅस्ट म्हणून मानली जाते. तिने आपल्या कारकिर्दीत 2 ऑलिम्पिक पदके, 14 जागतिक चॅम्पियनशिप आणि 21 युरोपियन चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत. द गार्डियन सारख्या अनेक वृत्तपत्रांनी अलिना पुतिन यांची गर्लफ्रेंड असल्याचा दावा केला आहे. मात्र, पुतिन यांनी हे कधीच जाहीरपणे स्पष्ट केलेले नाहीये. (Putin's secret girlfriend News)

अलिना ही आतापर्यंतची सर्वात यशस्वी जिम्नॅस्ट म्हणून ओळखली जाते

रशियन टाइम्सच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, अलिना तिच्या तिन्हीं मुलांसह एका लक्झरी व्हिलामध्ये लपून बसली आहे. या याचिकेच्या समर्थनार्थ आजपर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अलिना 38 वर्षांची असून ती एक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आहे. एलिना रशियाची सर्वात लवचिक महिला म्हणूनही ओळखली जाते. एलिना पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाच्या खासदारही होत्या.

डिसेंबर 2021 मध्ये शेवटचे पाहिले

युक्रेनमधील युद्धादरम्यान अलीनाला स्वित्झर्लंडला पाठवण्यात आल्याच्या पिटीशनची याचिका करण्यात आली आहे. अलिना 7 वर्षांहून अधिक काळ रशियन सरकार समर्थित नॅशनल मीडिया ग्रुपच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदीही राहिल्या आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, तिला दरवर्षी सुमारे 8 दशलक्ष युरो पगार मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT