"रशिया भारताचा विश्वासू मित्र नाही": अमेरिकन अधिकाऱ्याने केलं स्पष्ट

प्रमुख अमेरिकी अधिकाऱ्याने ‘लोकशाही देशांनी (Democratic Countries) एकत्र येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे.
Miss Nuland
Miss NulandDainik Gomantak

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मागील काही दिवसांपूर्वी युक्रेन युद्धासंबंधी रशियाबाबत भारताचा दृष्टिकोन वेगळा असल्याचे म्हटले होते. यातच आता एका प्रमुख अमेरिकी अधिकाऱ्याने ‘लोकशाही देशांनी एकत्र येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे. पुतीन यांच्या विरोधात संयुक्त आघाडी उघडल्याबद्दल अमेरिका (America), नाटो, युरोपियन युनियन (European Union) आणि प्रमुख आशियाई मित्र राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेचे कौतुक करताना बायडन (Joe Biden) यांनी ही माहिती दिली होती. क्वाड (QUAD) संघटनेत जिथे भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia), जपान आणि अमेरिका सदस्य देश आहेत. परंतु भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरुच ठेवले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) रशियावर टीका करत मतदानात सहभागी होण्यास देखील भारताने नकार दिला आहे. (A US official has said that Russia is not a loyal friend of India)

माध्यमाला दिलेल्या एका खास मुलाखतीत बोलताना, अमेरिकेतील राजकीय घडामोडींचे उपसचिव व्हिक्टोरिया नुलँड म्हणाल्या, "लोकशाही देशांनी एकत्र येऊन रशियाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. कारण पुतिन यांनी अशा निवडणुका घेतल्या आहेत. विशेष म्हणजे लोकशाही देशांनी हुकूमशाहीसारख्या देशांच्या विरोधात उभे राहावे लागेल. रशिया, चीन आणि भारतालाही हे सांगण्यात आले आहे.

Miss Nuland
'रशियावर निर्बंध लावण्यासाठी घाई करु नका'; बाल्टिक देश आक्रमक

मिस नुलँड पुढे म्हणाल्या, "आम्हाला माहित आहे की भारत आणि रशियामध्ये ऐतिहासिक संबंधबरोबर संरक्षण संबंध आहेत. परंतु आता काळ बदलला आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांचे देखील भारताबरोबर संरक्षण संबंध आहेत. आम्ही इंडो-पॅसिफिकमध्ये एकत्र काम करत आहोत. "रशिया आणि चीनसारखे निरंकुश देश हे दाखवत आहेत की, ते सुरक्षा आणि शांततेसाठी किती मोठा धोका बनू शकतात."

मिस नुलँड पुढे म्हणाल्या, रशियन आक्रमण "दुर्भावनापूर्ण आणि अमानुष" आहे. रुग्णालये आणि शाळांवर बॉम्बफेक करण्यात आले.

Miss Nuland
अमेरिका रशियावर निर्बंध घालण्याच्या तयारीत; जाणून घ्या कारण

त्या पुढे म्हणाल्या, "मला वाटते की भारताच्या दृष्टीकोनातही बदल होत आहे, म्हणूनच भारताबरोबर नव्याने संबंध प्रस्थापित करण्याची गरज आहे. भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानासंह प्रगती करत आहे. आणि विशेष म्हणजे अमेरिकाही यामध्ये मदत करु इच्छितो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com