रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात 'घोस्ट ऑफ कीव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युक्रेनियन पायलटचा मृत्यू झाला आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द टाइम्सने आपल्या वृत्तात हा दावा केला आहे. मिग-29 च्या युक्रेनियन पायलटला हे नाव देण्यात आले होते. त्याने युद्धादरम्यान डझनभर रशियन लढाऊ विमाने पाडली. टाईम्सच्या वृत्तानुसार, वैमानिकाची ओळख मेजर स्टेपन ताराबाल्का अशी झाली आहे. त्यांना लष्कराचे सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ द गोल्डन स्टार' आणि 'हिरो ऑफ युक्रेन' ने सन्मानित करण्यात आले.
टाईम्स आणि न्यूयॉर्क पोस्टनुसार, मेजर ताराबाल्का यांनी 13 मार्चला मारले जाण्यापूर्वी 40 रशियन विमाने पाडली. यूएस मीडिया संस्था नॅशनल पब्लिक रेडिओने दावा केला आहे की, 'आम्ही काही दिवसांपूर्वी पायलटचे पालक नहतालिया आणि इव्होन ताराबाल्का यांची मुलाखत घेतली होती.' यावेळी त्यांनी सांगितले की, 'आमच्या मुलाला लहानपणापासूनचं पायलट व्हायचं होतं. ते पुढे म्हणाले की, ''तो फ्लाइंग मिशनवर तैनात आहे, हे आम्हाला माहीत होतं. परंतु या मिशनवरुन तो पुन्हा परतलाच नाही.'' यापेक्षा अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
युक्रेन सरकारने हा व्हिडिओ ट्विट केला होता
फेब्रुवारीमध्ये रशियाने (Russia) युक्रेनविरुद्ध (Ukraine) युद्ध सुरु केले. यानंतर युक्रेन सरकारने 'घोस्ट ऑफ कीव' चा व्हिडिओ ट्विट करुन 'ऐस' म्हणून त्याचे कौतुक केले होते. युद्धात पाच किंवा अधिक शत्रूची विमाने पाडणाऱ्या वैमानिकाला 'एस' ही उपाधि दिली जाते. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'रशियाने युद्ध सुरु केल्यानंतर 30 तासांच्या आत पायलटने सहा रशियन विमाने पाडली. 26 फेब्रुवारीपर्यंत 10 विमाने पाडण्यात आली. एक लढाऊ विमान कारवाईत असून शत्रूच्या विमानांना लक्ष्य करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. विमानात बसलेल्या पायलटने हेल्मेट आणि चष्मा घातलेला आहे. त्यामुळे त्याला ओळखणे कठीण झाले आहे.
युक्रेनियन सैनिक रशियन सैनिकांविरुद्ध लढत आहेत
त्याच वेळी, युक्रेनियन सैनिक देशाच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील भागात पुढे जाण्याचा प्रयत्न करणार्या रशियन सैनिकांशी जोरदार मुकाबला करत आहेत. रशिया डॉनबासचा औद्योगिक प्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, अमेरिकेच्या (America) संरक्षण अधिकार्याने सांगितले की, 'रशियाचे हल्ले नियोजित हल्ल्यांपेक्षा खूपच कमी होत आहेत. शुक्रवारी काही शहरांमध्ये तोफांचे हल्ले, सायरन आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले. तर दुसरीकडे, मारियुपोलमधून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.' मारियुपोलचे महापौर म्हणाले की, 'शहरातील परिस्थिती भयानक आहे.' महापौर वेदिम बोइचेन्को म्हणाले की, ''नागरिक जीव वाचवण्यासाठी भीक मागत आहेत. आता ही काही दिवसांची नाही तर तासांची बाब बनली आहे.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.