Russia Ukraine War : युक्रेनवर रशियाने (Russia) केलेल्या आक्रमणानंतर रशियन सैन्याने युक्रेनच्या काही महत्त्वाच्या प्रातांवर ताबा मिळवला आहे. तसेच रशियन सैन्याने कीवमध्ये दाखल होत ताबा मिळल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांना युक्रेनच्या (Ukraine) राष्ट्राध्यक्षांनी चर्चेमधून मार्ग काढण्यासाठी आमंत्रण दिले असल्याचा मोठा दावा रशियन मिडियाकडून करण्यात आला आहे. (Ukraine's President Invites Vladimir Putin To Find A Way Out Of Talks)
भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी अखेर रवाना
युक्रेनमधील युध्दजनक परिस्थितीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी चेरनिव्त्सीमधून युक्रेन-रोमानिया सीमेवरुन रवाना झाली आहे. MEA कॅम्प ऑफिस आता ल्विव्ह आणि चेरनिव्हत्सी शहरांमध्ये देखील कार्यरत आहेत. त्याचबरोबर या कॅम्पमध्ये अतिरिक्त रशियन भाषिक अधिकाऱ्यांची तुकडीही पाठविण्यात आली आहे.
तसेच, युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पाश्वभूमीवर, युक्रेनस्थित भारतीय दूतावासाने शुक्रवारी देशात फसलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी एक निवेदन जाहीर केले आहे. ज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रोमानिया आणि हंगेरीमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी मोदी सरकार काम करत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. युक्रेनबरोबर वाटाघाटी करण्याचे आवाहन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतीन यांना कॉलवरील चर्चेदरम्यान केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.