Missile test  Dainik Gomantak
ग्लोबल

Ukraine's Missile Misses Target: युक्रेनच्या मिसाईलचा नेम चुकला; डागले रशियाच्या रडारवर, पडले युक्रेनमध्येच

अमेरिकन मिसाईलच्या वापरात नागरीक जखमी; यापुर्वीही 2 मिसाईल पोलंडमध्ये पडली

Akshay Nirmale

Ukraine's Missile Misses Target: सप्टेंबर महिन्यात ही घटना घडली होती. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास युक्रेनने AGM-88 B हे क्षेपणास्त्र डागले. हे क्षेपणास्त्र डागले होते रशियाची रडार सिस्टिम उद्धवस्त करण्यासाठी पण या क्षेपणास्त्राने लक्ष्य चुकवले आणि युक्रेनच्या क्रमाटोर्स्क भागात हे मिसाईल पडले. यात युक्रेनचे तीन जण जखमी झाले.

(Russia-Ukraine War)

अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने 24 नोव्हेंबर रोजीच्या एका बातमीत हा खुलासा केला आहे. हे मिसाईल अमेरिकेने युक्रेनला दिले होते.

या मिसाईलने युक्रेनमधीलच एका अपार्टमेंटवर निशाणा साधला होता. गेल्या 9 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात प्रथमच अमेरिकन मिसाईलचा वापर केला गेला होता. AGM-88 B हे एक हाय स्पीड अँटी रेडिएशन मिसाईल आहे. जे जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यात सक्षम आहे. हे मिसाईल मुख्यतः एअर डिफेन्स सिस्टिम आणि रडार सिस्टिम उद्धवस्त करण्यासाठीच बनविण्यात आले आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यातही युक्रेनची दोन मिसाईल्स लक्ष्यभेद करण्यात चुकली होती. ही मिसाईल्स पोलंडमध्ये पडली होती. यात दोघांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला ही मिसाईल्स रशियाने डागल्याचे बोलले जात होते. तथापि, नंतर स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, नाटोचे प्रमुख आणि पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांना रशियाला या बाबत क्लीनचीट दिली होती. युक्रेनच्या सैन्याकडूनही ही चूक झाली होती.

अमेरिकेने हे मिसाईल नौदल आणि हवाईदलासाठी व्हिएतनाम युद्धानंतर विकसित केले होते. हे मिसाईल लाँच केले की ते आजुबाजूच्या परिसरातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन शोधते. या मिसाईलमध्ये 40 पाउंड वजनाची स्फोटके असतात. दरम्यान, रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनला सातत्याने विविध देशांकडून लष्करी मदत मिळत आहे.

रशियाकडून सातत्याने सुरू असलेल्या डोनबास भागात भीतीचे वातावरण आहे. 9 मार्च रोजी भारताचेही एक मिसाईल चुकून पाकिस्तानच्या हद्दीत 124 किलोमीटर आत जाऊन पडले होते. चन्नू मियाँ शहराजवळ हे मिसाईल पडले होते. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT