युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) कार अपघातात थोडक्यात बचावले. व्होलोडिमिर झेलेन्स्कीला अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. झेलेन्स्की चे प्रवक्त्यांनी 15 सप्टेंबर रोजी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, एक वाहन झेलेन्स्कींच्या ताफ्याला आणि त्यांच्या कारवर येऊन आदळले.
व्होलोडिमिर झेलेन्स्कींना गंभार दुखापत झाली नाही
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे प्रवक्ते न्यकिफोरोव्ह म्हणाले, कायदा अंमलबजावणी एजन्सी या अपघाताची सखोल चौकशी करेल. अपघाताची सर्व परिस्थिती तपासली जाईल. राष्ट्रपतींचा ताफा कीवमधून जात असताना युक्रेनचे नेते वोलोडिमिर झेलेन्स्की यांना घेऊन जाणाऱ्या कारला कार धडकली, असे सांगण्यात येत आहे. पण या अपघातात राष्ट्रपतींना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War) नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. कीवने पूर्वेकडील भागांवर आक्रमण करून रशियाला मोठा धक्का दिला. ज्यामध्ये युक्रेनियन सैन्याने सहा महिन्यांच्या ताब्यानंतर इझियम या मोक्याच्या शहरात प्रवेश केला. युक्रेनियन सैन्याने खार्किव प्रदेशातून पूर्वेकडे नवीन आक्रमण सुरू केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनंतर, रशियन सैन्याला मोक्याचे पूर्वेकडील शहर रिकामे करण्यास भाग पाडले गेले. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी टेलिग्रामवर सांगितले की युक्रेनियन सैन्याने खार्किव प्रदेशातील चकालोव्स्कीची वस्ती मुक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.