Russia and Ukraine war Dainik Gomantak
ग्लोबल

Ukraine Russia War: रशियाचा युक्रेनवरती हवाई हल्ला

दैनिक गोमन्तक

किव्ह: युक्रेनमध्ये तीन बाजूंनी घुसलेल्या रशियाच्या सैन्याने आज राजधानी किव्हच्या वेशीवर रणगाडे आणले असून काही ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले आहे. किव्ह शहराच्या परिसरात रशियाने हवाई हल्ले केले. या युद्धात युक्रेनमधील 130 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याबाबत आक्रमकपणे इशारे देणाऱ्या देशांनी युद्धात सैन्य न उतरवता फक्त लष्करी साहित्य पुरविण्याची घोषणा केल्याने रशियापुढे युक्रेन हतबल झाल्याचे चित्र आहे.

युक्रेनच्या अनेक शहरांवर आज रशियाच्या विमानांनी आणि रणगाड्यांनी बाँबवर्षाव केला. युक्रेनच्या लष्करी तळांना त्यांनी प्रामुख्याने लक्ष्य केले. त्यांचे सैनिक आणि रणगाडे युक्रेनमधील शहरांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत असून काही शहरांवर त्यांनी कब्जाही मिळविला आहे. किव्ह शहराजवळच असलेल्या होस्तोमेल विमानतळावर दोनशे हेलिकॉप्टरच्या मदतीने ताबा मिळविल्याचा दावा रशियाने आज संध्याकाळी केला आहे. तसेच, यावेळी झालेल्या संघर्षात युक्रेनच्या दोनशे सैनिक मारल्याचा त्यांच्या संरक्षण मंत्रालयाने केला.

राजधानीत भयाचे वातावरण

रशियाचा हल्ला होत असलेल्या शहरांमधील नागरिक स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळ काढत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी हवाई हल्ल्यांची पूर्वसूचना देणारे सायरन सातत्याने वाजत आहेत. नागरी वस्त्यांवर हल्ला करणार नसल्याचे रशियाने जाहीर केले असले तरी पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, अनेक निवासी भागांमध्ये बाँबवर्षाव झाला आहे.

...तर हस्तक्षेप करू: बायडेन

युक्रेनमध्ये तूर्त सैन्य उतरविणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले असले तरी, रशियाने ‘नाटो’ देशांवर नजर वळविल्यास हस्तक्षेप करावा लागेल, असा इशारा अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला. पुतीन यांच्याबरोबर चर्चा करण्याची इच्छा नसली तरी युक्रेनच्या अध्यक्षांशी संवाद साधून त्यांना मदत मानवतावादी मदत करण्याचे आश्‍वासन दिल्याचे बायडेन यांनी सांगितले.

युक्रेनचा जोरदार प्रतिकार

कालपासून सुरु झालेल्या या युद्धात पहिल्या दिवशी युक्रेनमधील 137 जणांचा मृत्यू झाला असून 316 जणांचा मृत्यू झाला असल्याचे या देशाचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सांगत सर्व जगाला मदतीचे आवाहन केले. रशियाचेही 400 सैनिक मारल्याचे युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले असले तरी याबाबत पुष्टी होऊ शकलेली नाही.

आपण एकटे पडलो: ‘रशिया मला नंबर एकचे लक्ष्य तर माझे कुटुंब नंबर दोनचे लक्ष्य मानत आहेत. ते माझ्यासाठीच किव्हला येत हे मला माहीत आहे. युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखालाच लक्ष्य करून त्यांना युक्रेनला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचे आहे, पण मी राजधानीच राहणार आहे, माझे कुटुंबदेखील युक्रेनमध्ये आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमीर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी ठामपणे सांगितले. यावेळी आपण एकटे पडल्याची खंतही व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT