Ukraine Russia conflict Dainik Gomantak
ग्लोबल

Ukraine Attack: युक्रेनचा रशियाच्या तेल गोदामावर हल्ला! स्फोटानंतर भडकली आग; रशियाने डागली 7 क्षेपणास्त्रे, 76 ड्रोन

Ukraine Russia War: युक्रेनने रशियाच्या सोचीजवळील तेल साठवणूक केंद्रावर ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यानंतर तेलकेंद्रावर मोठी आग भडकली. त्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले करण्यात आले.

Sameer Panditrao

मॉस्को: युक्रेनने शनिवारी रात्री रशियाच्या सोचीजवळील तेल साठवणूक केंद्रावर ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यानंतर तेलकेंद्रावर मोठी आग भडकली. त्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले करण्यात आले.

‘‘ड्रोनचा मोठा अवशेष इंधनाच्या टाकीवर आपटल्यामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी १२० हून अधिक अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते,’’ असे क्रास्नोदर प्रांताचे गव्हर्नर वेनियामिन कोंद्रात्येव यांनी सांगितले. सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झालेल्या व्हिडिओमध्ये तेलकेंद्राच्या वरच्या भागात धुराचे मोठे लोट दिसत होते. या घटनेनंतर सोची विमानतळावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.

व्होरोनेझ भागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की आणखी एका युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात चार जण जखमी झाले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यानुसार, रशियाच्या हद्दीतील काळ्या समुद्राच्या दिशेने युक्रेनने केलेले ९३ ड्रोन हल्ले रविवारी रात्रीच्या सुमारास रशियन हवाई संरक्षण यंत्रणांनी निष्क्रिय केले.

गेल्या काही आठवड्यापासून युक्रेन आणि रशियामधील संघर्ष तीव्र होत चालला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये पाच मुलांचाही समावेश होता; तसेच १५० हून अधिक लोक जखमी झाले होते. नागरी वस्त्यांवर रशियाकडून हल्ले केले जात असून, गेल्या आठवड्यात एका रुग्णालयालाही रशियाने लक्ष्य केले होते.

७६ ड्रोनच्या साह्याने हल्ला

युक्रेनमधील मायकोलायिव शहरात रशियाच्या क्षेपणास्त्रांनी एका निवासी भागाला लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये सात जण जखमी झाल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनच्या हवाई दलाने रविवारी सांगितले की, रशियाने युक्रेनवर ७६ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी ६० ड्रोन व एक क्षेपणास्त्र पाडण्यात आले; परंतु उर्वरित १६ ड्रोन आणि ६ क्षेपणास्त्रांद्वारा आठ वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्या आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

SCROLL FOR NEXT