UK Visa Office in Karachi Adult Film Dainik Gomantak
ग्लोबल

Video: कराचीतील यूके व्हिसा ऑफिसमध्ये अचानक सुरु झाली 'अश्लिल फिल्म'; व्हिडिओ व्हायरल!

UK Visa Office in Karachi Adult Film: मागील काही दिवसांपूर्वी पाटणा जंक्शनवर अश्‍लील फिल्म चालल्याचे प्रकरण समोर आले होते.

Manish Jadhav

UK Visa Office in Karachi Adult Film: मागील काही दिवसांपूर्वी पाटणा जंक्शनवर अश्‍लील फिल्म चालल्याचे प्रकरण समोर आले होते. असाच एक प्रकार आता पाकिस्तानातील कराची येथून समोर आला आहे. कराचीतील यूके व्हिसा ऑफिसमध्ये टीव्ही स्क्रीनवर अचानक एक अश्लील फिल्म सुरु झाल्यामुळे लोक हैराण झाले.

वास्तविक, जेव्हा लोक त्यांच्या कागदपत्रांसह रांगेत उभे होते, तेव्हा व्हिसा सेंटरने चुकून मोठ्या स्क्रीनवर एक अडल्ट व्हिडिओ प्ले केला. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. ज्याचा व्हिडिओ आता तूफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, व्हिडिओच्या सुरुवातीला कराचीतील (Karachi) व्हिसा ऑफिसमध्ये लोक दिसतात. जिथे लोक त्यांच्या प्रवासाशी संबंधित व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आले होते. यानंतर मध्येच टीव्ही स्क्रीनवर अचानक एक अश्लील फिल्म चालू झाली. मोठ्या पडद्यावर पॉर्न फिल्म पाहिल्यानंतर महिला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काच बसला.

तिथे पोहोचलेल्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. मात्र, काही वेळातच ही त्रुटी समोर आल्यानंतर व्हिसा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हे प्रकरण हाताळले आणि टीव्ही बंद केला.

दुसरीकडे, या वर्षी पाटणा रेल्वे स्थानकावर अशीच एक घटना घडली होती. मार्चमध्ये, पटना जंक्शनवरील गर्दीच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी सेट केलेल्या टेलिव्हिजनवर एक अडल्ट फिल्म अचानक सुरु झाली होती.

इथे अडल्ट स्टार केंड्रा लस्टचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याने प्रवासी अचंबित झाले होते. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओवर पॉर्न स्टार केंड्रानेही प्रतिक्रिया दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT