UK Former PM Boris Johnson And Wife Carrie Johnson
UK Former PM Boris Johnson And Wife Carrie Johnson Instagram
ग्लोबल

बोरिस जॉन्सन 58 व्या वर्षी आठव्यांदा होणार वडील ; तिसऱ्या पत्नीने दिली गोड बातमी

Pramod Yadav

UK Former PM Boris Johnson And Wife Carrie Johnson To became Parents: ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबाबत एक विशेष बातमी समोर आली आहे. बोरिस जॉन्सन यांच्या तिसऱ्या पत्नीने एक गोड बातमी दिली असून, बोरिस जॉन्सन आठव्यांदा वडील होणार आहेत.

जॉन्सन यांची पत्नी कॅरी जॉन्सन यांनी शुक्रवारी (19 मे) इंस्टाग्रामवर त्या गरोदर असल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार कॅरी तिसऱ्यांदा आई होणार आहेत.

बोरिस जॉन्सन यांना यापूर्वी त्यांच्या दोन पत्नींपासून पाच मुले आहेत. तिसऱ्या पत्नीपासून दोन आणि या गोड बातमीनंतर ते आठव्यांदा वडील होणार आहेत. बोरिस जॉन्सनच्या तिसऱ्या पत्नीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या दोन मुलांसोबत फिरताना दिसत आहेत.

कॅरी जॉन्सन यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. 'घरी एक नवीन सदस्य येण्यासाठी फक्त काही आठवड्यांचा काळ बाकी आहे. गेल्या 8 महिन्यांपासून मला खूप थकवा जाणवत आहे. मी नव्या पाहुण्याला भेटण्यासाठी उत्सुक आहे.' अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे.

इंडिपेंडंटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, कॅरी जॉन्सन या 35 वर्षांच्या आहेत. त्या ब्रिटीश मीडिया सल्लागार देखील आहेत आणि कंझर्व्हेटिव्ह पार्टीसाठी मीडिया अधिकारी म्हणून काम करतात.

यूकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 2021 मध्ये कॅरी जॉन्सनशी लग्न केले. दोघांच्या लग्नापूर्वी त्यांना एक मूल होते. त्यांना तीन वर्षांचा मुलगा विल्फ आणि दोन वर्षांची मुलगी रोमी आहे. विल्फचा जन्म एप्रिल 2020 मध्ये झाला होता, रोमीचा जन्म डिसेंबर 2021 मध्ये झाला होता. बोरिस जॉन्सन यांचे हे 8 वे अपत्य असेल.

त्यांची दुसरी पत्नी मरिना व्हीलरपासून त्यांना 4 मुले आहेत. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, कला सल्लागार हेलन मॅकइंटायर यांच्याशी त्याचे संबंध आहेत, ज्यांच्यापासून त्यांना एक मूल आहे. बोरिस जॉन्सन यांना त्याची पहिली पत्नी अॅलेग्रा मोस्टिन हिच्यापासून मुले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT