pm modi & mohamed bin zayed Dainik Gomantak
ग्लोबल

UAE President India Visit: दोन तासांचा 'सस्पेन्स' दौरा! युएई अध्यक्षांची अचानक भारत भेट; मोठ्या निर्णयाची शक्यता? VIDEO

India Middle East Strategic Partnership: संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे अचानक नवी दिल्लीत झालेले आगमन जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरले.

Manish Jadhav

UAE President India Visit: संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे अचानक नवी दिल्लीत झालेले आगमन जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरले. केवळ दोन तासांच्या या संक्षिप्त दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सकृतदर्शनी हा दौरा औपचारिक वाटत असला तरी यामागे खाडी देशांमध्ये निर्माण झालेले गंभीर भू-राजकीय संकट असल्याचे मानले जात आहे. 2025 च्या अखेरीस अमिरात ज्या पद्धतीने प्रादेशिक राजकारणात एकाकी पडला आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताची साथ मिळवणे ही अमिरातीची मोठी गरज बनली.

गेल्या एका महिन्यात घडलेल्या घटनांनी अबु धाबीची कोंडी केली. एकेकाळी खाडी देशात वरचढ असलेले अमिरात आता येमेन, सोमालिया आणि सुदान या तीन आघाड्यांवरुन मागे हटले आहे. येमेनच्या दक्षिण भागावर अमिरातीने आपले नियंत्रण मिळवले होते, मात्र शेजारील सौदी अरेबियाने अमिरातीचे जहाज बॉम्बने उडवून दिल्यानंतर अमिरातीला तिथून माघार घ्यावी लागली. आता या भागावर सौदीचे पूर्ण नियंत्रण असून अमिराती समर्थक नेत्यांना देश सोडून पळावे लागले.

दुसरीकडे, अमिरातीचे इस्रायलशी वाढती जवळीक पाहून सोमालियाने सर्व द्विपक्षीय करार रद्द केले, जे आफ्रिकेतील अमिरातीच्या प्रभावासाठी मोठा धक्का मानला जातो. तसेच सुदानमध्ये (Sudan) अमिरातीवर नरसंहाराचे आरोप झाले असून आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटलाही दाखल झाला आहे.

या सगळ्या घडामोडींमध्ये सौदी अरेबियाचे वाढते वर्चस्व अमिरातीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सौदी अरेबिया आता तुर्की आणि भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत मिळून एक मजबूत लष्करी युती करण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानच्या मदतीने सौदीने येमेन, सोमालिया आणि लिबियामध्ये आपली पकड मजबूत केली आहे. सौदीची ही वाढती लष्करी शक्ती आणि पाकिस्तानशी असलेली जवळीक अमिरातीला आपल्या अस्तित्वासाठी धोका वाटत आहे. अशा परिस्थितीत भारतासारख्या महासत्तेचा विश्वास संपादन करणे झायेद यांच्यासाठी अनिवार्य झाले.

भारत (India) आणि अमिरात यांच्यातील व्यापारी संबंध सध्या सुवर्णकाळात आहेत. 2024-25 मध्ये उभय देशांतील व्यापार 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे, जो सौदीच्या तुलनेत 60 अब्ज डॉलर्सने जास्त आहे. सौदी आणि पाकिस्तानच्या वाढत्या मैत्रीमुळे भारतही सावध आहे. त्यामुळेच अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष भारताशी असलेले संबंध केवळ अल्पकालीन न ठेवता ते दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीत बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

याशिवाय, अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के 'टॅरिफ' लादल्यामुळे भारत आणि अमिरात या दोन्ही देशांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. या दोन तासांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि झायेद यांनी या व्यापारिक अडचणींवर तोडगा काढण्यासोबतच खाडीतील सौदी-पाकिस्तान युतीला शह देण्याबाबत खलबते केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: BBL सामन्यात खळबळ! पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्सच्या मॅचदरम्यान स्टेडियमला आग; थरारक व्हिडिओ व्हायरल

Dhave: सफर गोव्याची! पणजीतून पहिली कदंबा ज्या गावी आली, सत्तरीतला पहिला मुक्तीसंग्रह जिथे सुरु झाला असे स्वातंत्र्यसैनिकांचे 'धावे' गाव

Goa Noise Pollution: गोव्यात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांची खैर नाही! 36 जणांवर कारवाई करत 20 लाखांचा दंड वसूल; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कडक इंगा

Navpancham Rajyoga: राजयोगांचा राजा 'नवपंचम योग'! 30 वर्षांनंतर नशीब चमकवणार शनी-बुध; 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना

Goa Murder: 100 रुपयांचा 'रबर मुकुट' बनला रशियन तरुणींचा काळ! खुनी आलेक्सेईच्या फोनमध्ये सापडले 100 हून अधिक महिलांचे फोटो

SCROLL FOR NEXT