UAE Passport  Dainik Gomantak
ग्लोबल

UAE चा पासपोर्ट जगात सर्वाधिक 'पावरफुल'; जाणून घ्या भारत, पाकिस्तनची रॅंकिंग

2019 मध्ये युएईने (UAE) आपले अव्वल रँकिंग अबाधित ठेवले होते.

दैनिक गोमन्तक

आर्टन कॅपिटलने जारी केलेल्या ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये (Global Passport Index) संयुक्त अरब अमिरातीचा पासपोर्ट (UAE Passport) संपूर्ण जगात सर्वाधिक पावरफुूल असल्याची माहिती दिली आहे. सर्वाधिक मोबिलिटी स्कोर मिळवण्यासाठी यूएईला यादीत पहिले स्थान मिळाले आहे. याद्वारे 152 देशांमध्ये प्रवास करता येतो. यापैकी किमान 98 देशांमध्ये व्हिसा विनामूल्य प्रवेश उपलब्ध आहे, तर 54 देशांमध्ये अराइवल व्हिसा उपलब्ध असणार आहे. त्याच वेळी, 46 देशांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी व्हिसा आवश्यक असणार आहे. 2018 मध्ये यूएई पासपोर्ट सर्वात शक्तीशाली पासपोर्ट बनला होता. 2019 मध्ये युएईने आपले अव्वल रँकिंग अबाधित ठेवले होते. त्यानंतर मात्र 2020 मध्ये यूएईची 14 अंकानी घसरण झाली होती. तथापि, आता 2021 मध्ये त्याने आपले जुने स्थान परत मिळवले असून जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (Passport Ranking of UAE) बनले आहे. यामागे अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

यूएईने या वर्षाच्या सुरुवातीला नागरिकत्व कायद्यातील सुधारणांना मंजुरी दिली, ज्यामुळे गुंतवणूकदार, व्यावसायिक, विशेष स्किल्स असलेले लोक आणि त्यांचे कुटुंबियांना अमीराती नागरिकत्व आणि काही अटींनुसार पासपोर्ट मिळविण्याची परवानगी मिळाली (Passport Ranking India 2021 List). संयुक्त अरब अमिरातीचे नागरिकत्व व्यवसाय संस्था, मालमत्ता स्थापन करण्याचा किंवा मालकी हक्कासह अनेक फायदे प्रदान करते. हे रँकिंग स्वातंत्र्य आणि पासपोर्ट धारकांना व्हिसामुक्त प्रवासावर आधारित आहे. कोविड -19 महामारीनंतर, विविध देशांमधील व्हिसा नियमांमध्ये बदल झाल्यामुळे रँकिंगमध्येही बदल झालेला असल्याचे सांगण्यात येत आहे (Passport Ranking News). कोरोनाला आळा घालण्यासाठी जगातील अनेक प्रवासी वाहतूकीवर रोख लावला होता.

यूएईनंतर न्यूझीलंडचा (New Zealand) पासपोर्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या स्थानावर जर्मनी, फिनलँड, ऑस्ट्रिया, लक्झेंबर्ग, स्पेन, इटली, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचे पासपोर्ट आहेत. भारतीय पासपोर्ट रँकिंगमध्ये 72 व्या क्रमांकावर आहे (Passport Ranking India and Pakistan). मध्य पूर्व क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास, यूएई नंतर इस्त्रायलचा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली आहे. इस्रायली पासपोर्टने जगभरातील देशांमध्ये 17 वा क्रमांक मिळवला आहे. या देशातील नागरिकांना 89 देशांमध्ये व्हिसा विनामूल्य प्रवेश मिळतो, तर 37 देशांमध्ये अराइवल व्हिसा उपलब्ध आहे. दुसरीकडे 72 देशांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी व्हिसा आवश्यक आहे.

कतारचा पासपोर्ट मध्य पूर्व प्रदेशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर जगात 47 वा शक्तीशाली पासपोर्ट आहे. कतारी नागरिकांना 52 देशांमध्ये व्हिसा विनामूल्य प्रवेश मिळतो, 39 देशांमध्ये अराइवल व्हिसा तर 107 देशांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी व्हिसा आवश्यक असतो. कुवेतचा पासपोर्ट हा या प्रदेशातील इतर देशांमधील 50 वा सर्वात मजबूत पासपोर्ट आहे. (Kuwait Passport Ranking 2021). बहरीन 52 व्या, सौदी अरेबिया (Saudi Arabia) 55 व्या आणि ओमान 56 व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा पासपोर्ट (92 व्या क्रमांकावर) जागतिक स्तरावर सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे. त्यानंतर इराक, सीरिया, पाकिस्तान (89वा) (Passport Ranking For Pakistan), सोमालिया, येमेन, म्यानमार, पॅलेस्टिनी प्रदेश, इरिट्रिया आणि इराणचा क्रमांक लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT