कोरोना नियमांचे उल्लंघन UAE ने IndiGo एअरलाइन्सवर कारवाई

इंडिगो एअरलाईनने (IndiGo Airlines) यूएईच्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या काही प्रवाशांना प्रवास करण्यास मान्यता दिली होती.
Indigo flights
Indigo flightsDainik Gomantak

संयुक्त अरब अमिराती (UAE) ने इंडिगो फ्लाइट्सवर (Indigo flights) एका आठवड्यासाठी बंदी घातली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाईनने यूएईच्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या काही प्रवाशांना प्रवास करण्यास मान्यता दिली होती. वास्तविक, यूएईच्या प्रस्थान विमानतळावर आरटी-पीसीआर (RT-PCR) करणे अनिवार्य आहे. पण इंडिगोच्या काही प्रवाशांनी या नियमाचे उल्लंघन केले, त्यानंतर ही बंदी लागू करण्यात आली आहे. इंडिगोने म्हटले आहे की, काही ऑपरेशनल समस्यांमुळे यूएईला जाणारी इंडिगोची सर्व उड्डाणे 24 ऑगस्टपर्यंत रद्द राहतील.

इंडिगोने म्हटले आहे की, ज्यांनी आधीच यूएईसाठी तिकिटे बुक केली आहेत त्यांना ऑपरेशन पुन्हा सुरु झाल्यानंतर दुसऱ्या फ्लाइटचे तिकीट दिले जाईल किंवा त्यांना परताव्यासाठी मदत केली जाईल. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता यूएई सरकारने अलीकडेच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार, सर्व प्रवाशांना उड्डाणाच्या सहा तास आधी विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणीमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट येणे बंधनकारक आहे.

Indigo flights
Covid 19: भारतीयांसाठी ब्रिटेनमध्ये आता फक्त 'होम आयसोलेशन'

कुवेत भारतासोबत विमान सेवा सुरु करणार

कुवेत पुन्हा एकदा भारतासह इतर देशांसह व्यावसायिक उड्डाणे सुरू करेल. यामध्ये बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळसह पुन्हा सुरू होणारी उड्डाणे देखील समाविष्ट आहेत. भेटीदरम्यान, कुवेतच्या मंत्रिस्तरीय कोरोना विषाणू आपत्कालीन समितीने कोविड -19 टाळण्याच्या उपायांचे काळजीपूर्वक पालन केले जाईल. कुवेतच्या मंत्री समितीने बुधवारी निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली.

कोविड -19 च्या वाढीदरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने गल्फ स्टेटने भारतासह अनेक देशांमधून व्यावसायिक उड्डाणे स्थगित केली होती. कुवेतच्या नागरी उड्डयन महासंचालनालयाने एप्रिलमध्ये म्हटले होते की, भारतातून किंवा इतर कोणत्याही देशातून थेट येणाऱ्या सर्व प्रवाशांना भारताबाहेर किमान 14 दिवस घालवल्याशिवाय प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येईल.

Indigo flights
अमेरिकेचा तालिबान्यांवर Airstrike, 11 जणांचा खात्मा

कोरोना नियमांचे पालन करावे लागेल

प्रवाशांना प्रवासापूर्वी ऑनलाईन परमिटसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि निघण्यापूर्वी 48 तास आधी आरटीपीआर चाचणी सादर करावी लागेल. तसेच, कोविड -19 टाळण्यासाठी उपाय काळजीपूर्वक पाळले जातील. नियमानुसार, ज्यांना भारतातून लस मिळाली आहे त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र सादर केले पाहिजे आणि कुवैती आरोग्य मंत्रालयाची परवानगी घ्यावी. कोविड -19 निगेटिव्ह रिपोर्ट देखील 72 तास अगोदर सादर करावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com