FAST5 Grand Prize Dainik Gomantak
ग्लोबल

UAE Lucky Draw: भारतीयाचं नशीब यूएईत उजळलं; 25 वर्षे दर महिना मिळणार तब्बल 'इतके' लाख रुपये

UAE मध्ये राहणारा भारतीय तरुण मोहम्मद आदिल खान याने पहिले FAST5 ग्रँड प्राईज जिंकले आहे.

Ashutosh Masgaunde

FAST5 Grand Prize: UAE मध्ये राहणाऱ्या एका भारतीय तरुणाने एक खास लकी ड्रॉ जिंकला आहे. मूळचे लखनऊचा (Lucknow) असलेला मोहम्मद आदिल खान (Adil Khan) पहिल्या FAST5 ग्रँड प्राइझचा मानकरी ठरला आहे.

त्याने मिळवलेले प्राइझ साधे सुधे नसून एकदम खास आहे. कारण त्याला इथून पुढील 25 वर्षे दरमहा 25000 दिरहम अंदाजे 5.5 लाख भारतीय रुपये मिळणार आहेत.

हा लकी ड्रॉ जिंकल्यानंतर आदिल म्हणाला, "मी पहिल्यांदाच एखाद्या लकी ड्रॉचे तिकीट घेतले होते. आणि मला पहिल्याच प्रयत्नात बक्षीस मिळाले.

आता मला कुटुंबासाठी मोठे घर खरेदी करायचे आहे. यासोबतच इतर गुंतवणुकीच्या संधीही शोधायच्या आहेत.

लकी ड्रॉ तिकिट घेण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. सोशल मीडियाच्या वापरादरम्यान एक जाहिरात दिसली. आणि मग ते तिकिट ऑनलाइन खरेदी केले."

आदिलने आयुष्यात पहिल्यांदाच असे काहीतरी जिंकले आहे. तो म्हणाला, 'उर्वरित लकी ड्रॉमध्ये आम्हाला एकरकमी बक्षीस रक्कम मिळते. पण हे बक्षिस खूप खास आहे.

हे माझे दर महिन्याचे दुसरे उत्पन्न असेल, जे मला चांगली गुंतवणूक करण्याची संधी देईल. दुबईत कुटुंबासह राहण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या भावाचा कोविडमुळे मृत्यू झाल्यानंतर कुटुंबातील एकमेव कमावणारा आदिल म्हणतो की त्याला त्याच्या संपूर्ण कुटुंबाला यूएईमध्ये आणायचे आहे. तसेच आपल्या पुतण्यांना येथील शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA Test: एकाचं त्रिशतक, तर 3 खेळाडूंची द्विशतकं...भारतीय फलंदाजांचा दबदबा; कसोटी मालिकेपूर्वी आफ्रिकेचे गोलंदाज टेन्शनमध्ये

'विवाह नोंदणी' आता कोणत्याही तालुक्यातून शक्य! CM सावंतांची मोठी घोषणा, 8 ते 10 दिवसांत सुविधा सुरू होणार

Transgender Ban: ऑलिम्पिकमध्ये ट्रान्सजेंडर महिलांना बंदी? पॅरिस स्पर्धेतील वादानंतर IOC लवकरच घेणार मोठा निर्णय; लागू होणार नवा नियम

Viral Video: 'रील'साठी पठ्ठ्यानं धावत्या ट्रेनमध्ये घातला आंघोळीचा घाट, प्रवासीही हैराण, अखेर पोलिसांनी पकडले; व्हिडिओ तूफान व्हायरल

Pooja Naik : "पोलिसांना थोडा वेळ द्या", CM सावंतांकडून 'नवीन FIR'चे आदेश; नोकरी घोटाळा प्रकरणी तपासाची दिशा बदलणार?

SCROLL FOR NEXT