UAE Lottery Dainik Gomantak
ग्लोबल

UAE Lottery: मुंबईकर झाला करोडपती; यूएईमध्ये जिंकली 45 कोटींच्या लॉटरी

UAE Lottery: लॉटरी जिंकल्यानंतर सचिनने सांगितले की, हा माझे आणि माझ्या कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकणार क्षण आहे.

Ashutosh Masgaunde

Sachin From Mumbai On 45 cr Lottery In UAE:

UAE मध्ये राहणार्‍या एका ४७ वर्षीय भारतीय व्यक्तीने तब्बल 45 कोटींची लॉटरी जिंकली आहे.टेक्निशियन असलेल्या सचिन यांनी 139व्या महजूज सुपर सॅटर्डे लॉटरीचे प्रथक क्रमांकाचे पारितोषिक जिंकले आहे.

या साप्ताहिक सोडतीत त्यांना 20 दशलक्ष दिरहम (सुमारे 45 कोटी रुपये) मिळाले आहेत. दुसरीकडे आणखी एका भारतीय व्यक्तीनेही 10 लाख दिरहमचे बक्षीस जिंकले आहे. यानंतर या ड्रॉद्वारे यूएईमध्ये करोडपतीचा दर्जा मिळवणाऱ्या भारतीयांची संख्या २० झाली आहे.

सचिन हे मूळचे मुंबईचा आहे. ते पत्नी आणि तीन मुलांसह 25 वर्षांपासून दुबईत राहत आहेत. ड्रॉ जिंकल्यानंतर त्यांनी सांगितले की, मी दर आठवड्याला या लॉटरीमध्ये सहभागी होत होतो.

मला नेहमी अपेक्षा असायची की मी कधीतरी ही लॉटरी जिंकेन. आता हा विजय माझे आणि माझ्या कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकेल.

यासोबतच दुबईमध्ये नोकरीस असणारा आणखी एक भारतीय व्यक्ती गौतम यांनीही सोडतीतून 10 लाख दिरहम (सुमारे 2.25 कोटी रुपये) बक्षीस जिंकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम यांना शनिवारी एका ईमेलद्वारे त्याच्या विजयाची माहिती मिळाली.

गौतम यांनी सांगिले की, जेव्हा त्यांना हे समजले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सांगितले की ते चार वर्षांपूर्वी यूएईमध्ये नोकरीसाठी गेले.

आपल्या विजयाने आनंदीत झालेल्या गौतम यांनी सांगितले की, जिंकलेल्या पैशातून ते त्यांच्या गावी घर बांधणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: प्रेम, व्यवसायात शुभ योग! कसा असेल पुढचा आठवडा? जाणून घ्या..

Kudnem: कौंडिण्य ऋषींच्या नावाचा अपभ्रंश होऊन झालेले 'कुडणे', लुकलुकणाऱ्या काजव्यांची जत्रा भरून प्रकाशित होणारे मंदिर

Goa Cricket: ..आणखी एक 'क्रिकेटर' सोडणार होती गोवा! संघटनेची शिष्टाई सफल; सराव शिबिरास सुरवात

Goa Live News: नंबर प्लेट काढून धिंगाणा घालणाऱ्या दोन कार कार मालकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Goa Crime: दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, राजस्थानच्या आरोपीने केले अज्ञातस्थळी बंदिस्त; वाचा एकूण प्रकार

SCROLL FOR NEXT