Elon Musk Dainik Gomantak
ग्लोबल

''कुणी घर द्याल का घरं'', ट्विटरच्या नव्या मालकाकडे स्वतःचं घर नाही पण...'

दैनिक गोमन्तक

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलन मस्क यांनी मंगळवारी ट्विटर विकत घेतले आहे. हा करार $54.20 प्रति शेअर दराने 3.37 लाख कोटी रुपयांच्या रोख पेमेंटमध्ये करण्यात आला. ताज्या करारानंतर एलन मस्क (Elon Musk) यांची कंपनीत 100% भागीदारी असेल आणि ट्विटर (Twitter) ही त्यांची खाजगी कंपनी असेल. या करारामुळे एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Twitter owner Elon Musk has no home of his own living in a rented room)

दरम्यान, एलन मस्क यांच्या लाइफस्टाईलविषयी जाणून घेऊया. त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी असतील ज्या कदाचित तुम्हाला आधीच माहित असतील, पण अशाही अनेक गोष्टी असतील ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. चला तर मग जाणून घेऊया अशा व्यक्तीची कथा ज्याचे पृथ्वीवर घर नाही, पण त्यांना मंगळ ग्रहावर वसाहत स्थापन करायची आहे.

सर्वप्रथम एलन मस्क यांच्या त्या गोष्टी, ज्या तुम्हाला कदाचित माहित असतील...

  • एलन मस्क यांची आई अमेरिकन आणि वडील दक्षिण आफ्रिकन होते. त्यांचा जन्म 28 जून 1971 रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया शहरात झाला.

  • वयाच्या 12 व्या वर्षी, एलन मस्क यांनी एक व्हिडिओ गेम तयार केली आणि नंतर ते एका मासिकाला $500 मध्ये ती गेम विकली. स्पेस फायटिंग गेमचे नाव ब्लास्टर होते.

  • मस्क यांनी त्यांचा भाऊ किंबल यांच्यासोबत झिप 2 नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली. नंतर ती कॉम्पॅक कंपनीला 22 दशलक्ष डॉलर्सला विकली.

  • एलन मस्क यांनी 1999 मध्ये सुमारे $10 दशलक्ष गुंतवणुकीसह x.com सुरु केले. नंतर ते कॉन्फिनिटी नावाच्या कंपनीत विलीन झाले. जे नंतर PayPal बनले.

  • 2002 मध्ये, eBay ने $150 दशलक्षला PayPal विकत घेतले, ज्यामध्ये मस्क यांचा वाटा $165 दशलक्ष होता.

यानंतर मस्क यांनी अवकाश संशोधनाच्या तंत्रावर काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या याच कार्यक्रमाला 'स्पेस-एक्स' असे नाव देण्यात आले होते, ज्यात म्हटले होते की, 'आगामी काळात मानव इतर ग्रहांवर राहू शकेल'.

2004 मध्ये, एलन मस्क यांनी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाची स्थापना केली आणि सांगितले, 'भविष्यात सर्व काही इलेक्ट्रिक असेल, ज्यामध्ये अंतराळात जाणाऱ्या रॉकेटचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे हा बदल घडवून आणण्यात टेस्ला महत्त्वाची भूमिका बजावेल.'

आता एलन मस्कच्या अशा काही गोष्टी, ज्यांच्याबद्दल फार लोकांना माहिती नाही...

एलन मस्क यांनी डिसेंबर 2016 मध्ये ट्विट केले होते - ट्रॅफिकने मला वेडं केलं आहे. मी एक बोगदा बोरिंग मशीन बनवणार आहे, आणि खोदायला सुरुवात करणार आहे. त्याच दिवशी त्यांनी द बोरिंग कंपनीची नोंदणी केली. 2018 मध्ये त्यांनी भूमिगत बोगद्याचा नमुना देखील तयार केला. बोरिंग कंपनीच्या विकासासाठी त्यांनी एक मशीनही बनवली आणि त्यानंतर 20,000 युनिट्समध्ये त्या मशीनची विक्रीही केली.

तसेच, एलन मस्क यांना मंगळावर मानवांची एक स्वयंपूर्ण वसाहत स्थापन करायची आहे. अणुयुद्ध किंवा कोणत्याही लघुग्रहांच्या टक्करेमुळे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आल्यास अशा परिस्थितीत मंगळ आपल्यासाठी सर्वात योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याद्वारे मानव त्यांचा नाश टाळू शकतो. सप्टेंबर 2016 मध्ये, मस्क यांनी त्यांच्या योजना आणि तांत्रिक बाबी देखील तपशीलवार स्पष्ट केल्या आहेत. मस्क यांच्या मते, 2022 पर्यंत स्पेसएक्स रॉकेट मंगळावर जाऊ शकेल. 2050 पर्यंत, एक स्वयंपूर्ण मानवी वस्ती असेल.

दुसरीकडे, मानवी मेंदूला संगणकाशी जोडण्याचा विचार आपण फक्त करु शकतो, पण एलन मस्क यांनी न्यूरालिंकच्या माध्यमातून एक मशीन विकसित करण्यास सुरुवात केली आहे, जी मानवी मेंदूला संगणकाशी जोडते. एलन यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता ही शक्यता नाकारता येत नाही.

एलन मस्क यांनी 2016 मध्ये त्यांच्या चुलत भावाकडून सोलार सिटी विकत घेतली. यानंतर ते सोलर टाइल्सवर नवनवीन शोध लावत आहे. अर्थातच तुमच्या घराचे छप्पर आणि भिंती अशा असतील, ज्यामुळे सूर्यापासून ऊर्जा निर्माण होईल. मे 2018 मध्ये, एलन मस्क यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'मी एक कँडी कंपनी सुरु करणार आहे. याबाबत मी खूप गंभीर आहे.' त्यानंतर त्यांनी बोरिंग कँडी सुरु केली. ही कँडी अंतराळात घेऊन जाता येऊ शकते.

आपली सर्व आलिशान घरे विकून एलन मस्क कुठे राहतात

2020 मध्ये, एलन मस्क यांनी ट्विटरवर सांगितले की, 'अवघ्या एका वर्षात मी 7 आलिशान घरे विकली.' फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, तो 20x20 च्या भाड्याच्या घरात राहतो. हे घर Boxabl नावाच्या गृहनिर्माण स्टार्टअपने बांधले आहे. हे घर फोल्ड करण्यायोग्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT