Twitter | Elon Musk  Dainik Gomantak
ग्लोबल

Twitter वर आता दिवसातून वाचता येणार फक्त 600 पोस्ट, मस्क यांची मोठी घोषणा

एलॉन मस्कने पुन्हा ट्विट करत एक मोठी घोषणा केली आहे.

Puja Bonkile

Twitter New Rule: एलॉन मस्क यांनी विकत घेतल्यापासून ट्विटर नेहमीच चर्चेत राहत आहे आहे. आता एलॉन यांनी ट्विटरशी संबंधित आणखी एक मोठी घोषणा ट्विट करत केली आहे. आता ट्विटरवर दिवसाला पोस्ट वाचण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ट्विटरवर पोस्ट वाचण्यावर सध्या तात्पुरत्या मर्यादा घालण्यात आल्या आहे. डेटा स्क्रॅपिंगमुळे हा कठोर निर्णय घेतला असल्याचे इलॉन मस्क यांनी माहिती दिली आहे.  

एलॉन मस्क काल ट्विट करत सांगितले की डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ब्लू टिक असणारे यूजर यांना दिवसाला सहा हजार पोस्ट वाचता येणार आहे.

तर ब्लू टिक नसणारे यूजर यांना दिवसाला 600 पोस्ट वाचता येणार आहे. तर नव्याने ज्यांनी ट्विटरवर अकाऊंट काढले आहेत अशा अनव्हेरिफाईड अकाऊंटसला दिवसाला 300 पोस्ट वाचता येणार आहे. तसेच एलॉन मस्क यांनी ही लवकरच या मर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

मस्क यांनी डेटा स्क्रॅपिंगमुळे हा दुसरा निर्णय घेतला आहे. आता ट्विटर पाहण्यासाठी तुम्हाला लॉग-इन करणे बंधनकारक आहे. ट्विटर अकाउंट नसेल तर तुम्हाला ट्विटर ब्राऊज करता येणार नाही.

ट्विटरवरून डेटाची चोरी होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी त्यांनी हा निर्णय घेतला. एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले आहे.

त्यांनी अनेकदा सांगितलंय की, ट्विटरला तोट्यातून बाहरे काढण्याच्या दृष्टीनं ते प्रत्येक गोष्टीचा विचार करतात.आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लाँच केले आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे.

ट्विटरच्या या निर्णयामुळे अनेक मोठ्या कंपन्यांना देखील हा नियम लागू असल्याने आता सर्वांचीच चिंता वाढल्याचे दिसत आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सर्वत्र रेट लिमिट लागू करण्यात आले आहे त्यामुळे ट्विट करण्यात तसेच इतरांचे ट्विटर अकाऊंटला फॉलो करण्यात अडचणी येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Today Live Updates: डिचोलीत 24 नोव्हेंबरला 'नवा सोमवार'; शांतादुर्गा देवीचा प्रसिद्ध उत्सव रंगणार

Ranji Trophy 2025: 5 विकेट गेल्या, पंजाबच्या कर्णधाराचे झुंझार शतक; महत्वाच्या सामन्यात गोव्याची पकड ढिली

Goa Sand Extraction: वाळू व्यवसायाच्या वादातून गोळीबार, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई; 5 संशयितांना ठोकल्या बेड्या

Goa Politics: खरी कुजबुज; ‘गोंय विकले घाटार’

Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

SCROLL FOR NEXT