Twitter Elon Musk Dainik Gomantak
ग्लोबल

Twitter पुन्हा बंद, टाईमलाइनवर नवे ट्विट दिसत नाहीये; मस्कची उडवली जातेय खिल्ली

ट्विटरवर नवीन ट्विट मिळत नसल्याबद्दल भारतासह जगभरातील युजर्सकडून तक्रारी केल्या जात आहेत.

Manish Jadhav

Elon Musk: ट्विटर आज पुन्हा डाउन झाले आहे. गेल्या काही तासांपासून यूजर्सची टाइमलाइन अपडेट होत नाहीये. ट्विटरवर नवीन ट्विट मिळत नसल्याबद्दल भारतासह जगभरातील युजर्सकडून तक्रारी केल्या जात आहेत. जरी वापरकर्त्यांना त्यांचे ट्विटर अकाऊंट उघडण्यात कोणतीही अडचण येत नाही. गेल्या तीन ते चार महिन्यांत ट्विटरच्या सेवा अनेक वेळा खंडित झाल्या आहेत.

दरम्यान, मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवरील हा घोळ केवळ भारतातच नाही तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळत आहे. ट्विटरवरही #TwitterDown ट्रेंड करत आहे. ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी अलीकडेच सांगितले की, 'ते आणि त्यांची टीम सध्या ट्विटरवरील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम करत आहोत.' परंतु तसे होताना दिसत नाही.

ट्विटरची नवीन समस्या फीडची

ट्विटरची (Twitter) नवीन समस्या फीडची आहे. नवीन फीड वापरकर्त्यांच्या टाइमलाइनवर येत नाही. अनेक वापरकर्त्यांच्या टाइमलाइनवर 5 ते 6 तास जुने फीड येत आहे. सोशल मीडिया आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरवरही शेकडो तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. वापरकर्त्यांनी DownDetector वर नोंदवले आहे की, फीडची समस्या मोबाइल अॅप आणि डेस्कटॉप दोन्हीवर येत आहे.

ट्विट करायला हरकत नाही

वापरकर्ते सांगत आहेत की, त्यांना ट्विटरवर मित्रांचे ट्विट दिसत नाहीत. जरी वापरकर्ते स्वत: ट्विट करण्यास सक्षम आहेत. पण ते दिसत नाही. ट्रेंडिंग हॅशटॅग देखील ट्विटरवर वापरकर्त्यांना दिसत होते. सर्वात ट्रेंडिंग हॅशटॅगपैकी एक #TwitterDown आहे. ज्या अंतर्गत हजारो ट्विट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात पावसाची दमदार वापसी! विजांचा कडकडाट, पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

England T20 World Record: अशक्य ते शक्य! इंग्रजांनी टी-20 मध्ये केल्या 300 धावा; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वविक्रमाची नोंद, पाहा Highlights

Konkan Railway: तिकीटची माहिती, ट्रेन लोकेशन, सुविधा… कोकण रेल्वेनं लाँच केलं 'KR Mirror' अ‍ॅप, एका क्लिकवर मिळणार A टू Z माहिती

Watch Video:"जेणें तुमकां पेजेक लायलां तें सरकार तुमकां जाय?सरदेसाईंचा तरुणांना सवाल; बेरोजगारीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर

Maoist Sujata Surrender: कुख्यात माओवादी सुजाताचे 43 वर्षानंतर आत्मसमर्पण; सरकारने जाहीर केले होते एक कोटी रुपयांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT