Turkey-Syria Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey-Syria Earthquake: मृतांचा आकडा 15,000 वर... ढिगाऱ्याखाली अजूनही शोध सुरू

जखमींची संख्या 65 हजारांवर

Akshay Nirmale

Turkiye-Syria Earthquake Updates: तुर्कीए आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारीला झालेल्या भूकंपामुळे मोठी नासधूस झाली आहे. सर्वत्र ढिगारा पसरला असून ओरड सुरू आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.

दोन्ही देशांमध्ये मृतांचा आकडा 15,000 च्या वर गेला आहे. तर जखमींची संख्या 65 हजारांहून अधिक आहे. याशिवाय हजारो इमारती जमीनदोस्त झाल्यानंतर आणखी अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले जाण्याची शक्यता आहे.

तुर्कीमध्ये 12,391 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 62,914 लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, सीरियामध्ये मृतांची संख्या 3,486 झाली आहे, तर येथे जखमींची संख्या 5,247 असल्याचे सांगण्यात येत आहे.

तुर्कीएचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी बुधवारी (8 फेब्रुवारी) भूकंपग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेतला.

तुर्कीएतील नूरदगीसह अनेक शहरांचे रूपांतर आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यात झाले आहे. रुग्णालये आणि शवागाराबाहेर मृतदेहांचा ढीग साचला आहे.

दरम्यान, आपत्ती क्षेत्रातून सुमारे 20,000 लोकांना बाहेर काढले आहे, अशी माहिती, तुर्कीएच्या एअरलाईन्सने दिली आहे. शिवाय अतिरिक्त 30,000 प्रवासी उड्डाण करतील अशी अपेक्षा आहे.

हा शक्तिशाली भुकंप 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. तुर्कीए-सीरियासह शेजारी देशांमध्ये 150 हून अधिक आफ्टरशॉक जाणवले. ग्रीनलँडपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. राजधानी अंकारा, नुरदगी आणि 10 शहरे तुर्कीमधील सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये आहेत.

व्यक्तींची ओळख न पाहता मदत आणि बचाव कार्य केले जात आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT