Turkey MP  Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey: सरकारी विधेयकाच्या निषेधार्थ खासदाराने मोबाईल फोन हातोड्याने फोडला

या विधेयकात, ऑनलाइन माहितीवर मोठ्या प्रमाणावर सेन्सॉरशिप लादण्यात आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Turkey: तुर्कस्तानच्या संसदेत भाषण देत असताना एका खासदाराने रागाच्या हातोड्याने आपला मोबाईल फोडला. इंटरनेटवर सध्या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तुर्कस्तान मधील विरोधी पक्ष, रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे खासदार, बुराक एर्बे सरकारच्या एका विधेयकाचा निषेध करताना दिसत आहेत. सरकारचे विधेयक ऑनलाइन चुकीची माहिती विरोधात आहे.

(Turkey MP smashes phone with hammer in parliament)

या विधेयकानुसार खोटी माहिती प्रसारित केल्यास संबधित व्यक्तीला तीन वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागू शकतो. खासदार, बुराक एर्बे यांनी सरकारच्या या विधेयकाचा विरोध केला. तसेच, हे विधेयक व्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन करते असा आरोप त्यांनी केला. प्रेस स्वातंत्र्याबाबत भाष्य करणाऱ्या संघटनांनी या विधेयकाचा विरोध केला आहे. पुढील वर्षी तुर्कीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

वादग्रस्त विधेयक सत्ताधारी पक्ष जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टीने (AKP) आणले आहे. या विधेयकात देशातील पत्रकारिता आणि सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक अधिकार देण्यात आले आहेत. "या विधेयकात, ऑनलाइन माहितीवर मोठ्या प्रमाणावर सेन्सॉरशिप लादण्यात आली आहे, आणि पत्रकारितेचे गुन्हेगारीकरण करण्यात आले आहे. असे 22 प्रेस स्वातंत्र्य संस्थांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT