Turkey Drone Attack In Syria
Turkey Drone Attack In Syria Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey Drone Attack In Syria: तुर्कीयेचा सीरियावर ड्रोन हल्ला; चार अमेरिका समर्थित सैनिक ठार, 11 नागरिक जखमी

Manish Jadhav

Turkey Drone Attack In Syria: एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने कहर केला आहे. इस्त्रायल सातत्याने हमासशासित शहरांवर हल्ले करत आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. तुर्कीयेने उत्तर सीरियामध्ये ड्रोन हल्ला केला आहे. तुर्कीयेने शुक्रवारी संध्याकाळी हा हल्ला केला. या ड्रोन हल्ल्यात अमेरिका समर्थित चार सैनिक ठार झाले आहेत. तर 11 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुर्दिश नेतृत्वाखालील सैन्याने ही माहिती दिली. यापूर्वी तुर्कीयेचे अध्यक्ष एर्दोगान म्हणाले होते की, त्यांचे सरकार उत्तर सीरियातील कुर्दीशांच्या नेतृत्वाखालील गटांवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

दरम्यान, नुकताच इस्त्रायलने राफाह शहरावर हल्ला केला. त्यानंतर या हल्ल्यासंबंधी जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर राफाह शहरावर करण्यात आलेल्या हल्ल्याकडे लक्ष वेधण्यासाठी मोहिम राबवण्यात आली. 'ऑल आइज ऑन राफाह' मोहीम सोशल मीडियावर जगभरात ट्रेंड करत आहे. सेलिब्रेटी, खेळाडू आणि लाखो सोशल मीडिया यूजर्स युद्धग्रस्त राफाहवरील इस्रायलच्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोहिमेत भाग घेत आहेत. लोक पॅलेस्टाईनसोबत असल्याचा संदेश देत आहेत. 26 मे रोजी इस्त्रायली हवाई हल्ल्यात राफाहमधील निर्वासित सेंटरमधील लहान मुलांसह 45 नागरिक ठार झाले. या घटनेनंतर इस्त्रायलवर जगभरातून टिकेचा भडिमार सुरु झाला.

इस्रायलने निर्वासितांच्या सेंटरवरील हल्ला नाकारला

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल लष्करी कारवाईत गाझामध्ये आतापर्यंत 36 हजार लोक मारले गेले आहेत. व्यापक टीकेनंतर, इस्रायलने राफाहमधील निर्वासितांच्या सेंटरवरील हल्ल्याचा आरोप फेटाळून लावला. हमासच्या सेंटरवर रॉकेट आदळल्यामुळे आग लागल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, 'ऑल आइज ऑन राफाह' मोहिमेने सोशल मीडियावर जोर धरला आहे. आतापर्यंत जवळपास 45 दशलक्ष यूजर्संनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या मोहिमेचा प्रचार केला आहे. सोशल मीडियवरील मोहिमेनंतर इस्रायलचा तिळपापड झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT