Narendra Modi & Recep Tayyip Erdoğan Dainik Gomantak
ग्लोबल

तुर्कीने भारताचा गहू का केला परत, काश्मीर मुद्यावरही ओकली गरळ

रशिया (Russia) आणि युक्रेन यांच्यात मागील तीन महिन्यांपासून युध्द सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील तीन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. या युध्दामुळे जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. यातच एकीकडे जगभरातील देश मोदी सरकारकडून भारतीय गव्हाच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे तुर्कस्तानने बेताल वक्तव्यानंतर भारतीय गहू खराब असल्याचे सांगून तो परत केला. 29 मे पासून 56877 टन भारतीय गहू भरलेली जहाजे तुर्कीतून गुजरातच्या बंदरांवर परत आणली जात आहेत. भारतीय गव्हात रुबेला विषाणू आढळून आल्याचे तुर्कीने म्हटले आहे. त्यामुळे परत पाठवण्यात येत आहेत. तुर्कीचे हे पाऊल आश्चर्यकारक नाही, याआधीही तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी काश्मीर मुद्यावरुन बेताल वक्तव्ये केली आहेत. (Turkey has said that the rubella virus has been found in Indian wheat)

दरम्यान, तुर्कस्तानने फायटोसॅनिटरी चिंतेमुळे भारतीय गव्हाची खेप नाकारुन परत पाठवली. ही जहाजे तुर्कस्तानहून (Turkey) गुजरातमधील (Gujarat) कंडाला बंदरात परत येत आहेत. S&P ग्लोबल कम्युनिटी इनसाइट्सच्या अपडेटनुसार, या निर्णयामुळे भारतीय व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तुर्की अधिकार्‍यांनी सांगितले आहे की, भारतातून आलेल्या गव्हामध्ये रुबेला विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे तुर्कीच्या कृषी आणि वन मंत्रालयाने त्याचा वापर करण्यास परवानगी दिली नाही.

आतापर्यंत, भारताच्या वाणिज्य आणि कृषी मंत्रालयाने अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. तथापि, अधिकारी मानतात की, रुबेला रोग कोणत्याही आयातदार देशासाठी गंभीर चिंतेचे कारण असू शकतो. परंतु भारतीय गव्हाच्या बाबतीत हे एक दुर्मिळ उदाहरण आहे.

रुबेला व्हायरस काय आहे

रुबेला विषाणू किंवा जर्मन गोवर हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगामुळे बऱ्याचदा शरीरावर विशिष्ट लाल पुरळ दिसून येतात. मात्र संसर्गजन्य रुग्णांमध्ये कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. रुबेला विषाणूचा संसर्ग 3-5 दिवस टिकू शकतो. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकतो किंवा शिंकतो किंवा नाक आणि घशातून स्त्राव होतो तेव्हा त्याचा प्रसार होऊ शकतो.

तुर्कीच्या आरोपांचा भारतावर काय परिणाम होतो?

दरम्यान, अशा वेळी संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंज देत आहे. युक्रेन-रशिया यांच्यातील महायुद्धामुळे भारतीय गव्हाची मागणी वाढली आहे. त्यानंतर भारत सरकारला निर्यातीवर बंदी घालावी लागली. भारतीय गव्हातील रुबेला विषाणूचे आरोप चिंताजनक असू शकतात. रुबेलाच्या चिंतेमुळे तुर्कीने भारतीय गहू परत केल्याने आंतरराष्ट्रीय मागणीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे देशात आणि परदेशात गव्हाच्या किमती खाली येऊ शकतात.

एर्दोगन काय म्हणाले काश्मीरवर?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्यासोबतच्या संयुक्त परिषदेत एर्दोगन यांनी पाकिस्तानची बाजू घेतली. काश्मीरबाबतच्या ठरावांना आपला पाठिंबा आहे. 2023 पासून पाकिस्तान (Pakistan) आणि तुर्की एकत्र युद्धनौका तयार करतील असेही तुर्की राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT