Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Hamas War: इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा टॉप कमांडर ठार, मध्य गाझामध्ये लपला होता कुख्यात दहशतवादी!

Israel Hamas War: इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात हमासचा टॉप कमांडर मारला गेला आहे.

Manish Jadhav

Israel Hamas War: इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात हमासचा टॉप कमांडर मारला गेला आहे. इस्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, हमासचा हा सर्वात कुख्यात दहशतवादी मध्य गाझामध्ये मारला गेला आहे.

याआधी हमासचे इतर 6 टॉप कमांडरही मारले गेले आहेत. पण हा कमांडर त्या सर्वांमध्ये सर्वात कुप्रसिद्ध होता. त्याच्या सर्वोच्च कमांडरच्या हत्येला हमासच्या लष्करी शाखेनेच दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाचे दोन खतरनाक दहशतवादीही ठार झाले आहेत.

हमासच्या (Hamas) लष्करी विंग, कासम ब्रिगेड्सने सांगितले की, मध्य गाझा पट्टीमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात त्यांचा एक प्रमुख कमांडर ठार झाला आहे. आयमन नोफेल असे हमासच्या या टॉप कमांडरचे नाव आहे.

गाझा पट्टीवर इस्रायली बॉम्बफेकीत मारला गेलेला तो सर्वात कुख्यात हमासचा दहशतवादी आहे. त्याला अबू मोहम्मद या नावानेही ओळखले जात होते.

अबू मोहम्मद ऊर्फ नोफेल मंगळवारी इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाला. इस्रायली लष्कराने मध्य गाझा पट्टीतील बुराजी कॅम्पला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात नोफेलचा खेळ संपला.

यापूर्वीही 6 कमांडर मारले गेले होते

याआधी हमासचे इतर अनेक वरिष्ठ कमांडर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेले आहेत. मुएताज ईदचीही एक दिवस आधी हत्या करण्यात आली होती. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात मुएताज ईदची मोठी भूमिका होती.

इस्त्रायली गुप्तचर यंत्रणा त्याच दिवसापासून यामागे होती. अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे, इस्रायली हवाई दलाने गाझाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात हवाई हल्ला केला आणि मुएताजचा खात्मा केला.

इस्रायलच्या (Israel) या हवाई हल्ल्यात हमासचा लष्करी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, त्याचा व्हिडिओही जारी करण्यात आला आहे.

आतापर्यंत हमासचे अनेक टॉप कमांडर मारले गेले असून त्यात बिलाल अल केदरा, अली कादी, मुराद अबू मुराद यांची नावे आहेत. गेल्या 24 तासांत इस्रायली सैन्याने हमासची सुमारे 250 ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

SCROLL FOR NEXT