Tom Stuker
Tom Stuker Google image
ग्लोबल

Tom Stuker: एक गोल्डन तिकीट; आणि विमानाने 100 देशांमध्ये प्रवास, 120 वेळा गेला हनिमुनला...

Akshay Nirmale

Tom Stuker: हॉलीवूड अभिनेता जॉर्ज क्लुनी याचा एक गाजलेला चित्रपट आहे Up in the Air नावाचा. त्यामध्ये जॉर्जने रायन बिंघम नावाच्या एचआर विभागातील अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यात तो सतत विमान प्रवास करत असतो.

त्याचे बहुतांश आयुष्य त्याने विमानातच व्यतीत केलेले असते. 2009 मध्ये आलेल्या या माईल्ड कॉमेडी चित्रपटाने चांगले यश मिळवले होते.

हे आठवण्याचे कारण म्हणजे, एकीकडे विमानाचे एक तिकीट बूक करताना सर्वसामान्य व्यक्ती 100 वेळा विचार करतील, पण जगात एक अशी व्यक्ती आहे जिने विमनाद्वारे सुमारे 4 कोटी किलोमीटर प्रवास केला आहे. त्याने पत्नीला 120 हून अधिक वेळा हनिमूनला नेले आहे आणि तेही मोफत.

टॉम स्टकर असे या व्यक्तीचे नाव असून तो अमेरिकेचा नागरिक आहे. दरम्यान, एवढे फिरूनही विमान प्रवास करणे थांबवण्याचा त्याचा कोणताही हेतू नाही. त्याला आयुष्यभर फ्लाइटमधून प्रवास करायचा आहे. विशेष म्हणजे, जगात कोणत्याही व्यक्तीने आत्तापर्यंत एवढा विमानप्रवास केलेला नाही.

69 वर्षीय टॉम स्टकर यांनी 1990 मध्ये युनायटेड एअरलाइन्सचा पास खरेदी केला होता. त्यावेळी त्याची किंमत 290 हजार डॉलर्स म्हणजेच आजच्या किंमतीनुसार सुमारे 2.37 कोटी रुपये होती. हे एक गोल्डन तिकीट होते.

कारण कंपनीने ठरवले होते की, जो कोणी हा पास विकत घेईल त्याला आयुष्यभर अमेरिकन एअरलाइन्सच्या कोणत्याही फ्लाइटमध्ये मोफत प्रवास करता येईल. त्यामुळे टॉमची चांदी झाली. टॉमला त्याची त्याची आवडती सीट 1B मिळाली, ज्यावर बसून त्याने 4 कोटी किलोमीटर हवाई प्रवासाचा आनंद लुटला आहे.

विशेष म्हणजे, यात जगभरातील अलिशान हॉटेल्समध्ये राहणे, रेस्टॉरंट्समध्ये खाणे-पिणे याचा खर्चही एअरलाईन्सनेच केला आहे.

विशेष म्हणजे, टॉमला ही सीट विकता आली असती आणि त्यातून पैसे मिळवता आले असते. किंवा त्याचा लिलाव करता आला असता, पण टॉमने असे काही केले नाही. आणि तेव्हापासून तो सतत प्रवास करत आहे. टॉमने जगभरचा प्रवास केला आहे.

याबाबत टॉम म्हणाला की, एका आठवड्यापेक्षा जास्त काळ कुठे राहिलो तर मला चुकल्यासारखे वाटते. मला लगेच आकाशात जाऊ वाटते आणि मग मी पुढच्या प्रवासाला निघतो.

टॉम त्याच्या या अनलिमिटेड युनायटेड पासचा वापर करून 100 हून अधिक देशांमध्ये गेला आहे आणि त्याने 120 हून अधिक वेळा आपल्या पत्नीला हनिमूनला नेले आहे. तो 300 हून अधिक वेळा ऑस्ट्रेलियाला गेला आहे.

टॉम आता प्रवासासाठी प्रवास करतो. कामासाठी किंवा सुट्टीसाठी नाही. विशेष म्हणजे, स्टकरला जेनेट जॅक्सन, स्टीव्हन टायलर आणि बिल मरे यांसारख्या सेलिब्रिटींसोबत बसण्याची संधीही मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT