Heartland Virus Twitter
ग्लोबल

अमेरिकेत कोविड नंतर लहान जीवांपासून पसरतोय प्राणघातक व्हायरस

Heartland Virusअलीकडेच सापडला जो लोन स्टार टिकमध्ये आढळतो. यू.एस.मध्ये आतापर्यंत 6 राज्यांमध्ये व्हायरस आढळून आला

दैनिक गोमन्तक

वॉशिंग्टन: कोरोना विषाणूचा (Covid-19) जगातून पूर्णपणे नायनाट झाला नसताना तज्ञांच्या चितेंत आणखी एक भर पडली आहे. आता अमेरिकेत एक नवीन विषाणू वेगाने पसरत आहे. हा विषाणू एखाद्या लहान जीवाच्या डसल्याने पसरत असला तरी तो अत्यंत घातक मानला जातो आहे. हा लहान प्राणी एक टिक आहे, जो प्राणी आणि मानवांच्या शरीरात चिकटून राहतो आणि त्यांचे रक्त शोषतो. यासोबतच हा विषाणू मानवी शरीरात अनेक प्रकारचे आजारही निर्माण करतो.

याहार्टलैंड वायरस (Heartland Virus) अमेरिकेतील 6 राज्यांमध्ये पसरला आहे. सध्या तो जॉर्जियामध्ये पसरत आहे. लोन स्टार टिक या टिक जीवांच्या प्रजातीद्वारे त्याचा प्रसार होत आहे. हार्टलँड व्हायरसची लागण झालेल्या काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध (CDC) विभागाने दिलेल्या माहितीनुसार या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. याचा संसर्ग झालेले बहुतेक लोक बरे होतात पण त्यामुळे काही वृद्ध लोकांचा मृत्यू झाला आहे.

CDC च्या माहितीनुसार हार्टलँड व्हायरस पहिल्यांदा 2009 मध्ये अमेरिकेतील मिसूरी येथे काही मानवी शरीरामध्ये आढळून आला होता. 2009 ते जानेवारी 2021 या कालावधीत यामुळे बाधित झालेल्यांची संख्या 50 होती. तो आर्कान्सास, जॉर्जिया, इलिनॉय, इंडियाना, आयोवा, केंटकी, मिसूरी, नॉर्थ कॅरोलिना, ओक्लाहोमा आणि टेनेसीमध्ये पसरला. संशोधकांचे म्हणणे आहे की या विषाणू आणि रोगाबद्दल अद्याप फारशी माहिती पुढे आली नाही. पण त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. याबद्दल जाणून घेण्यासाठी संशोधक सतत संशोधन करत असतात.

या विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असल्याने त्याबाबत संशोधन करण्यात येत आहे. एमोरी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संशोधनात शोधून काढले की जॉर्जियामध्ये सापडलेला एकमेव लोन स्टार टिक हार्टलँड विषाणूचा प्रसार करत आहे. हा अहवाल इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीजेस या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. 2005 मध्ये जॉर्जियामध्येही या विषाणूमुळे मृत्यू झाला होता.

हार्टलँड व्हायरस रोगाची लक्षणे कोणती आहेत?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण होते तेव्हा त्याला ताप, भूक न लागणे, डोकेदुखी, सर्दी, जुलाब आणि स्नायू दुखणे यांसारखे लक्षण दिसून येते. सीडीसीनुसार, रुग्णामध्ये पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्सची पातळी कमी होते. तसेच यकृतातील एन्झाईम्सची पातळी वाढते.

कशी केली जाते या आजाराची टेस्ट?

आतापर्यंत, हार्टलँड व्हायरसने एखाद्याला संसर्ग झाला आहे हे शोधण्यासाठी जगात कोणतीही विशिष्ट चाचणी नाही. अमेरिकेत, एखाद्याला संसर्ग झाल्याचा संशय असल्यास डॉक्टर राज्य प्रशासनाशी संपर्क साधतात. यानंतर प्रशासन सीडीसीशी संपर्क साधते. यानंतर त्या व्यक्तीच्या आण्विक आणि सेरोलॉजिकल चाचण्या घेतात. ज्यामध्ये हार्टलँड व्हायरस आरएनए आढळून येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आत्मविश्वास उंचावेल,नात्यांमध्ये विश्वास वाढेल; 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

SCROLL FOR NEXT