Pakistan Sialkot Explosion: पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये मोठे हल्ले

या हल्यामुळे सियालकोटमध्ये खळबळ उडाली आहे
Pakistan Sialkot Explosion
Pakistan Sialkot ExplosionTwitter
Published on
Updated on

पाकिस्तानमधील (Pakistan) सियालकोटमध्ये (Sialkot) काही मोठे हल्ले (Blast) झाले आहेत. या हल्यामुळे लष्करी तळावर (Army Base) भीषण आग लागली आहे. या हल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. हे हल्ले कसे झालेत याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

दरम्यान इमरान खान सरकारविरुद्ध संसदेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. अशातच सियालकोटमध्ये हल्ले झाल्याने इमरान खानचे सरकार अडचणीत आणले जाऊ शकते.

Pakistan Sialkot Explosion
रशिया-युक्रेन युद्ध जगासाठी टर्निंग पॉइंट

दरम्यान स्फोट झालेली जागा दारुगोळ्याचे साठवण क्षेत्र असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण पसरले आहे. पण या स्फोटामध्ये किती नुकसान झाले याची महिती समोर आली नाही. पण या स्फोटाची तीव्रता लक्षात घेता येथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्फोटामागे कोणाचा हात आहे याची माहिती समोर आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com