Shooting at Mexico City: अमेरिकेतील मेक्सिको सिटीमध्ये शनिवारी झालेल्या बाईक रॅलीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.
महापौर म्हणाले की, बाईक रॅलीदरम्यान गोळीबार झाला, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. ही घटना मेक्सिकोच्या रेड रिव्हर भागातील आहे.
न्यू मेक्सिको पोलिसांनी (Police) सांगितले की, एका जखमी व्यक्तीला उपचारासाठी डेन्व्हरला विमानाने नेण्यात आले आहे. मुख्य रस्त्यावरील बाइक रॅलीत हजारो लोक सामील झाले. येथे हल्लेखोरांनी गोळीबार केला.
जखमींना ताओस येथील होली क्रॉस हॉस्पिटल आणि न्यू मेक्सिको विद्यापीठ, अल्बुकर्क येथे उपचारासाठी नेण्यात आले.
महापौर लिंडा काल्होन यांनी सांगितले की, गोळीबारात सहभागी असलेल्या सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपी बाईक रॅलीमध्येच सहभागी होते. घटनास्थळासह संपूर्ण परिसर पोलिसांच्या निगराणीखाली आहे.
घटनास्थळाजवळ कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास पूर्ण होईपर्यंत मुख्य रस्त्यासह परिसरातून लोकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गोळीबारानंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आदेशानुसार, या परिसरातील बार, दारुची दुकाने आणि इतर आस्थापनांना कर्फ्यू दरम्यान दारु विक्री करता येणार नाही.
काही दिवसांपूर्वी न्यू मेक्सिकोच्या फार्मिंग्टनमध्ये गोळीबार झाला होता. या गोळीबारात तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते.
चकमकीत संशयित आरोपी (Accused) जागीच ठार झाल्याची माहिती पोलिसांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली.
पोलिसांनी या घटनेबाबत फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते की, स्थानिक पोलीस अधिकारी आणि न्यू मेक्सिको पोलीस अधिकाऱ्याला चकमकीत गोळ्या घालण्यात आल्या.
संशयितांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.