Rocket Attacks In Syria Dainik Gomantak
ग्लोबल

Syria: रॉकेट हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक जखमी, अमेरिकेनेही दिले चोख प्रत्युत्तर

Rocket Attacks In Syria: सीरियामध्ये झालेल्या दोन रॉकेट हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Rocket Attacks In Syria: सीरियामध्ये झालेल्या दोन रॉकेट हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत. यूएस सेंट्रल कमांड (Centcom) ने यासंबंधी एक निवेदनही जारी केले आहे. सीरियामधील दोन रॉकेट हल्ल्यांमध्ये तीन अमेरिकन सैनिक जखमी झाले, त्यानंतर अमेरिकेनेही चोख प्रत्युत्तर दिले. मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, जखमी झालेल्या तीन जवानांपैकी एकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर दोघांवर उपचार सुरु आहेत.

इराण समर्थित दहशतवाद्यांनी हल्ला केला

यूएस सेंट्रल कमांड (Centcom) ने बुधवारी सांगितले की, 'इराण-समर्थित अतिरेक्यांनी बुधवारी संध्याकाळी ईशान्य सीरियातील (Syria) कोनोको आणि ग्रीन व्हिलेज या दोन्ही ठिकाणी अमेरिकन सैन्याच्या निवासस्थानावर गोळीबार केला.'

तथापि, अमेरिकन सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी वापरण्यात आलेली तीन वाहने आणि उपकरणे अमेरिकेने (America) नष्ट केली आहेत. स्पुतनिकने सूत्रांचा हवाला देत सांगितले की, 'प्राथमिक अंदाजानुसार दोन किंवा तीन संशयित दहशतवादी (Terrorist) अमेरिकन सैन्याने मारले आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT