Naftali Bennett
Naftali BennettDainik Gomantak

'इराण म्हणजे दहशतवादाचा ऑक्टोपस': इस्रायली पंतप्रधान

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने आयोजित केलेल्या दावोस समिटमध्ये इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी मंगळवारी जगाला इशारा दिला.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने आयोजित केलेल्या दावोस समिटमध्ये इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) यांनी मंगळवारी जगाला इशारा दिला. जर इराणवरील निर्बंध शिथिल केले तर तुम्ही दहशतवादाला खतपाणी घालत आहात असे होईल, असे ते म्हणाले. त्यांनी इराणला (Iran) दहशतीचा ऑक्टोपस म्हटले. हा देश एका प्राण्यासारखा आहे, ज्याचे डोके तेहरानमध्ये आहे आणि बाकीचे हात संपूर्ण पश्चिम आशियामध्ये आहेत.

बेनेट यांनी दावोसमध्ये (Davos) बोलताना म्हटले, इराण हा पश्चिम आशियातील दहशतवादाचा उगमस्थान असणारा देश आहे. जगातील सर्व देशांनी त्याला विरोध केला पाहिजे. त्यांनी पुढे असा दावा केला की, जो देश इराणशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो तो शेवटी अपयशी ठरतो, कारण इराण चतुराईने आपले दहशतवादी इतर देशांमध्ये दहशत पसरवण्यासाठी पाठवतो.

Naftali Bennett
तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानचा पाकिस्तानसोबतचा व्यापार झाला कमी

इस्रायलचे (Israel) पंतप्रधान पुढे म्हणाले, "दहशतवादाच्या ऑक्टोपसला अब्जावधी डॉलर्सची मदत देणे आमच्यासाठी धोक्याचे ठरेल, कारण त्यातून नेमकं काय मिळणार आहे. त्यातून वाढलेला दहशतवाद मात्र तुम्हाला मिळेल. पश्चिम आशियामध्ये तुम्ही काय पाहत आहात. आता, तुम्हाला दुप्पट मिळेल आणि तिप्पट वाढलेले दिसेल." ते पुढे म्हणाले की, मी एक व्यापारी असल्याने मला सांगायचे आहे की इराण म्हणजे व्यापार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com