This unique fish specializes in changing color

 

Dainik Gomantak

ग्लोबल

सरड्यासारखा रंग बदलण्यात माहीर असा मासा तुम्ही पाहिला का?

जर आपण रंग बदलणाऱ्या प्राण्यांबद्दल बोललो तर सर्वात आधी गिरगिटाचे नाव येते.

दैनिक गोमन्तक

जर आपण रंग बदलणाऱ्या प्राण्यांबद्दल बोललो तर सर्वात आधी गिरगिटाचे नाव येते. पण जगात असाही एक मासा आहे, जो गिरगिटासारखा रंग बदलू शकतो. त्याचप्रमाणे जपानमधील (Japan) एका मत्स्यालयात जगातील एका विषारी माशाचा रंग चर्चेचा विषय राहिला आहे. होय, आम्ही डिमन स्टिंगर माशाबद्दल (Fish) बोलत आहोत, हा मासा इतका विषारी आहे की त्याच्या डंकाने मानव किंवा मोठ्या माशांना काही काळ बेशुद्ध केले जाऊ शकते. दुर्मिळ गोल्डन डेमन स्टिंगरला वैज्ञानिकदृष्ट्या इनिमिकस डिडॅक्टिलस म्हणतात.

मत्स्यालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, या माशाच्या शरीराचा रंग सहसा राखाडी किंवा वाळूचा असतो. पाण्याच्या तळाला धोका वाटत असताना किंवा शिकार करण्यासाठी तो त्याच्या शरीराचा रंग बदलतो, मात्र सोनेरी रंगाचा मासा पहिल्यांदाच दिसला आहे. या माशाचा रंग सोनेरी का झाला, याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. सुरुवातीच्या तपासात शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, रंग बदलण्यामागे जीनमधील उत्परिवर्तन हे कारण असू शकते, परंतु सध्या ते सांगता येणार नाही.

तो दिसायला थोडासा फुगलेला दिसतो, जणू तो दगडाचा तुकडा आहे. त्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा रंग बदलणे. या अनोख्या माशाची लांबी 25 ते 26 सेंटीमीटरपर्यंत वाढू शकते. डेमॉन स्टिंगर सहसा रात्री शिकार करतो. तो शांतपणे पाण्याच्या तळाशी वाळू खणतो आणि त्याच्या आत लपतो. त्याच्या शरीराभोवती विषारी काटे असतात. तो दिसायला थोडासा फुगलेला दिसतो, जणू तो दगडाचा तुकडा आहे. त्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा रंग बदलणे म्हणजेच कॅमफ्लाज.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की डेमन स्टिंगर (Demon Stinger) हल्ला करून शिकार करतो किंवा स्वतःहून हल्ला टाळतो. या माशाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या माशाला नैसर्गिकरित्या कोणताही धोका नाही. त्याच्या विषारी काट्यांमुळे कोणताही मोठा मासा किंवा सागरी प्राणी त्याची शिकार करत नाही. त्याला कधी धोका आहे असे वाटले तर तो स्वतःला लपवतो आणि डंख मारण्याचा प्रयत्न करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

SCROLL FOR NEXT