Ruby Roman Grapes Dainik Gomantak
ग्लोबल

'या' फळाची किंमत ऐकून तुम्ही म्हणाल सोनं घेतलेलं बर बाबा !

निवडलेल्या द्राक्षांवर (Grapes) स्टॅंडर्ड मार्क दिला जातो आणि विशेष म्हणजे या द्राक्षांच्या विक्रीसाठी देखील कडक नियम आहेत.

दैनिक गोमन्तक

जगात एखाद फळ किती महाग असु शकत हे जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर आश्चर्यकारक माहिती समोर येऊ शकते. अशाच एका महागड्या फळाबद्दल (Fruits) आपण आज जाणुन घेणार आहोत. उष्णकटिबंधीय देशांमधील (Tropical countries) उत्कृष्ट हवामानामुळे त्याठीकाणी फळ स्वस्त दरात मिळतात. स्वस्त दरात फळ उपलब्ध होत असल्यामुळे या भागात राहणारे लोक ही फळे मुबलक प्रमाणात खरेदी करु शकतात. मात्र एक असेही फळ आहे, ज्याची किंमत लाखो रुपयांपर्यंत आहे. आपला विश्वास बसणार नाही मात्र रुबी रोमन द्राक्षे (Ruby Roman Grapes) एवढी महाग आहेत की त्या फळांची भारतातली सुमारे 7,50,000 रुपये आहे. तर एका द्राक्षाची किंमत सुमारे 35,000 रुपये एवढी आहे. (This is the most expensive fruit in the world, know the price)

जगातील सर्वात महाग द्राक्षे

जगातील अत्यंत दुर्मीळ फळांपैकी एक म्हणुन रुबी रोमन द्राक्ष ओळकली जातात. या द्राक्षांच्या फक्त एका घडाची किंमत जास्त आहेच, मात्र या द्राक्षाचे उत्पादन देखील मर्यादीत स्वरुपात घेतले जाते. दरवर्षी फक्त 2400 घडांचे उत्पादन घेतले जाते. कमी उत्पन्न घेण्याचे कारण म्हणजे नैसर्गिक पद्धतिने केली जाणारी लागवड. प्रत्येक द्राक्षाच्या गुणवत्तेची हमी देण्यासाठी या द्राक्षांची कसून तपासणी केली जाते. निवडलेल्या द्राक्षांवर स्टॅंडर्ड मार्क दिला जातो. विशेष म्हणजे या द्राक्षांच्या विक्रीसाठी देखील कडक नियम आहेत.

एका द्राक्षाचे वजन 20 ग्रॅम

द्राक्षांच्या विशेष बाबींपैकी एक म्हणजे प्रत्येक द्राक्षाचे वजन 20 ग्रॅम असते आणि ते द्राक्ष पिंग पोंग बॉलच्या आकाराचे असते, परंतु काही द्राक्षे 3 सेंटीमीटरपेक्षा मोठ्या आकाराची सुद्धा असू शकतात. जपानी लक्झरीयस फळ बाजारामध्ये व्हिटिकल्चरला जास्त मागणी आहे. 2008 मध्ये रुबी रोमन द्राक्षाने नवीन प्रीमियम द्राक्ष वाण म्हणून सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार सर्वात महाग द्राक्ष विकसित करण्यासाठी तब्बल 14 वर्ष वाट पहावी लागु शकते.

काही दिवसांपुर्वीच जपानमधील जगातील सर्वात महागडा आंबा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जपानच्या मियाझाकी शहरात या आंब्याचे उत्पन्न घेतले जाते, म्हणूनच याला मियाझाकी आंबा म्हटले जाते. जगातील सर्वात प्रीमियम फळांपैकी हा आंबा एक आहे. जपानमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या फळांमध्ये सुद्धा या आंब्याचे नाव आहे. किमान 8,600 / - पासुन सुरू होणाऱ्या या प्रजातीच्या दोन आंब्याच्या बॉक्ससाठी 3 लाख रुपये सुद्धा मोजावे लागु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT