Work  Dainik Gomantak
ग्लोबल

आठवड्यात फक्त 40 तासच काम ; 'या' देशात होणार कायदा

गोमन्तक डिजिटल टीम

कामाचे तास कमी झाल्याचे कुणाला आवडणार नाही, आणि एखाद्या देश त्यासाठी पुढाकार घेत असेल तर, आणखीनच चांगली बाब आहे. एका देशात आठवड्यातील कामाचे तास 45 वरून 40 पर्यंत कमी करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. यासंबधीचे एक विधेयक त्यांनी मांडले आहे. चिलीचे (Chile) अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक (Gabriel Boric) यांच्या सरकारने मंगळवारी (दि.23) याबाबत माहिती दिली. गॅब्रिएल त्यांचे निवडणूक आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विधेयक मंजूर झाले तर पुढील पाच वर्षांत या देशात आठवड्यातील कामाचे तास 45 वरून 40 पर्यंत कमी होतील. हे विधेयक 2017 मध्ये चिलीच्या संसदेत सादर करण्यात आले आणि तेव्हापासून ते लटकले आहे. बोरिक यांनी या विधेयकाचे वर्णन 'तातडीचे' असे केले आहे. यानंतर, चिलीच्या घटनेनुसार, कायद्याच्या निर्मात्यांना शक्य तितक्या लवकर त्यावर काम करावे लागणार आहे.

चिलीचे सर्व खासदार बोरिक सरकारने विधेयकात केलेल्या अनेक बदलांवर चर्चा करतील. यामध्ये विशिष्ट श्रेणींमध्ये कामाचे तास कमी करण्यासाठी वेळ मर्यादा वाढवणे अशा गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक चालक आणि घरगुती कामगार यांचाही समावेश आहे. बोरिक यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनात एका समारंभात सांगितले की, "या सुधारणा आवश्यक आहेत जेणेकरून, एक नवीन चिली तयार करू शकू जे अधिक न्याय्य असेल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT