Nuclear Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Nuclear Attack: 'या' देशावर अणुहल्ला झालाच तर कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही; कारण...

Nuclear Attack: तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर बंकरचा वापर जनसामान्यांचे संरक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

Nuclear Attack: काही दिवसांपूर्वी रशियाच्या हवाई हल्ल्यात युक्रेनमधील एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला होता. महत्वाचे म्हणजे ही महिला अशा हल्ल्यापासून वाचण्यासाठी बनवलेल्या बंकरबाहेर उभी होती कारण बंकरला कुलुप होते.

या महिलेच्या मृत्यूनंतर युक्रेनच्या सरकारने ठिकठिकाणच्या बंकरवरील टाळे हटविण्याची मोहिम सुरु केली आहे. यादरम्यानच काही देश नवीन बंकर बनवत आहे किंवा जून्या बंकरमध्ये सुधारणा करत आहेत. असे बंकर न्यूक्लिअर हल्ल्यापासून वाचण्यासाठी महत्वाचे ठरतात. त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर बंकरचा वापर जनसामान्यांचे संरक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो.

जगात असाही एक देश आहे ज्याने अणुहल्ल्यापासून आपल्या जनतेच्या संरक्षणासाठी उपाययोजना केली आहे. स्विर्झलंडने आपल्या देशात ठिकठिकाणी बंकर बनवले आहेत. स्विर्झलंड हा आपल्या परराष्ट्र धोरणानुसार युद्धाच्याबाबतीत तटस्थ दिसून येतो. मात्र स्विर्झलंडच्या सैन्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे असून देशातील पुरुषांना सैन्याचे ट्रेनिंग घेणे बंधनकारक आहे.

या धोरणानुसार स्विर्झलंड आपल्या देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतो. इतकेच नाही तर 1963 ला आलेला सिव्हील प्रोटेक्शन लॉ नुसार नवीन बनत असलेल्या इमारतीत एक शेल्टर तयार करणे बंधनकारक आहे. आठ पेक्षा जास्त खोल्या असलेल्या इमारतींना हा कायदा लागू आहे.

असे आहेत स्विर्झलंडमधील बंकर

हे बंकर सैन्याच्या अधिकारक्षेत्राखाली येतात. यामध्ये वीज, पाणी या गरजेच्या सुविधा उपलब्ध आहेत. विषारी हवेपासून संरक्षण करण्यासाठी बंकरला एअर फिल्टर लावले आहेत. बंकरचे स्टक्चर एखाद्या कॅप्सूलसारखे आहे.

दरवाजा व्यवस्थित बंद होण्यासाठी याला एक एअरलॉक आहे, महत्वाचे म्हणजे, याला एक एमर्जन्सी दरवाजा देखील आहे. अशा प्रकारे स्विर्झलंडच्या सरकारने युद्धजन्य परिस्थितीत आपल्या नागरिकांच्या सुरक्षततेसाठी न्यूक्लिअर बॉम्बपासून वाचवण्यासाठी बंकर निर्माण केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एसी डब्यात सिगारेट ओढणाऱ्या तरुणीचा हंगामा; प्रवाशांनी विरोध करताच सुरु झाली बाचाबाची

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Viral Video: 1997 साली जमिनीखाली गाडलं गेलेलं जलजीराचे पॅकेट 27 वर्षानंतर जसंच्या तसं सापडलं, नेटकरी म्हणाले, 'Don't Use Plastic'

Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

SCROLL FOR NEXT