US Poop Donor company
US Poop Donor company Dainik Gomantak
ग्लोबल

US Poop Donor: चक्क मानवी विष्ठेसाठी 'ही' कंपनी देते कोट्यवधी रुपये; जाणून घ्या यामागचे कारण...

गोमंतक ऑनलाईन टीम

US Poop Donor Company: शीर्षक वाचून आश्चर्य वाटेल पण त्यात काहीही खोटं नाही. अमेरिका आणि कॅनडामध्ये कार्यरत असणारी एक कंपनी चक्क मानवी विष्ठा दान म्हणून स्विकारते आणि त्यासाठी वर्षाला कोट्यवधी रूपये मोजते. ही कंपनी एका दात्याला विष्ठेसाठी दर महिन्याला 500 डॉलर ( म्हणजे सुमारे 41,000 रुपये) देऊ करत आहे.

ह्युमन मायक्रोब्स असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी जगभरातून मानवी विष्ठेचे नमुने स्विकारण्यासाठी तयार आहे.

कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही दररोज मल (विष्ठा) दान केली तर त्याची वार्षिक किंमत 1,80,000 डॉलर इतकी होते. म्हणजे केवळ विष्ठेपासून तुम्ही एका वर्षात 1.5 कोटी रुपये कमवू शकता. कोणताही माणूस त्याच्या मलानुसार कंपनीकडे पैसे मागू शकतो.

ह्युमन मायक्रोब्स या कंपनीची स्थापना 2020 मध्ये मायकेल हॅरोप यांनी केली होती. कोणतीही व्यक्ती कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन याबाबत माहिती भरू शकते. यानंतर एखाद्याला त्याचा मल दान करायचा असेल तर त्याला मुलाखत द्यावी लागेल.

कंपनीचे उद्दिष्ट

होस्ट-नेटिव्ह सूक्ष्मजंतू शोधणे हे ह्युमन मायक्रोब्स कंपनीचे उद्दिष्ट आहे. हे सुक्ष्मजंतू केवळ 0.1 टक्के लोकांमध्ये आढळतात. या शोधातून डॉक्टर आणि संशोधकांना एखाद्या रुग्णामध्ये रोगांशी लढणाऱ्या सूक्ष्मजंतूंविषयी माहिती मिळते.

सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्यांच्या विष्ठेमध्ये संशोधनासाठी उपयुक्त असे सूक्ष्म जीव असतात. अशी 'गुणवत्ता' असलेल्या विष्ठेचा वापर संशोधन करण्यासाठी केला जाऊ शकतो.

गेल्या अनेक दशकांपासून धोकादायक आजार आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे वाईट परिणाम यात वाढच होत चालली आहे. त्यामुळेच या विष्ठेचा वापर मानवी आरोग्य अधिक चांगले करण्यासाठी सुरू असलेल्या संशोधनासाठी केला जात आहे.

जे विष्ठा देतात त्यांना त्यांची विष्ठा ड्राय आयसिंगच्या मदतीने पाठवावी लागेल. विष्ठेशी संबंधित माहितीचा वापर डॉक्टर धोकादायक रोगांशी लढण्यासाठी करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bombay High Court: ''विदेशी नागरिक आपल्या देशात मंत्री कसा होऊ शकतो''; सिक्‍वेरा यांच्याविरोधात मिकी यांची हायकोर्टात याचिका

Chandel Water Treatment Plant: चांदेल जलशुद्धी प्रकल्पामध्ये ‘क्लोरीन’ गळती; अनर्थ टळला

Churchill Alemao: ''माझे मत सेक्‍युलर पार्टीलाच, पण काँग्रेसला...''; आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

Goa Crime News: नागाळीत चोरट्यांचा 'सुळसुळाट', दोनापावलातूनही सोन्याचे दागिने लंपास; पोलिसांच्या दुर्लक्षाचा होतोय आरोप

Goa Crime News: पत्‍नीच्‍या खूनप्रकरणी दोषी पतीला कोर्टाने सुनावली जन्‍मठेपेची शिक्षा; 50 हजारांचा दंडही ठोठावला

SCROLL FOR NEXT