Dubai Airport Dainik Gomantak
ग्लोबल

Dubai Airport: दुबई बनले जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ, जाणून घ्या एका वर्षात किती कोटी लोकांनी प्रवास केला?

Manish Jadhav

Dubai Airport: मध्यपूर्वेतील देश यूएईच्या नावावर आणखी एक कामगिरी जमा झाली आहे. पर्यटनाचा विस्तार करणाऱ्या या देशाला जगभरातून मोठ्या संख्येने प्रवाशांनी भेट दिली. यामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे. जाणून घ्या एका वर्षात किती कोटी लोकांनी हवाई प्रवास केला. 'दुबई आय'वर केंद्रित असलेल्या एका कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जगातील सर्वात व्यस्त असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कोरोना महामारीच्या आधीच्या वर्ष 2019 च्या तुलनेत खूप जास्त होती. दुबई (Dubai) विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल ग्रिफिथ्स यांनी सोमवारी सरकारी रेडिओ स्टेशन 'दुबई आय'वरील एका कार्यक्रमात ही माहिती दिली.

'DXB' कोरोना महामारीच्या संकटातून सावरले

2023 च्या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, 'DXB' म्हणून ओळखले जाणारे विमानतळ महामारीच्या संकटातून सावरले आहे, जरी 2018 च्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा हा आकडा अजूनही कमी आहे. आकडेवारीनुसार, 2023 मध्ये 8.69 कोटी प्रवाशांनी (Passengers) विमानतळावरुन प्रवास केला, तर 2019 मध्ये हा आकडा 8.63 कोटी होता. जर 2018 बद्दल बोलायचे झाल्यास, यावर्षी 8.91 कोटी प्रवाशांनी येथून प्रवास केला, जो महामारीपूर्वीचा उच्चांक आहे.

जाणून घ्या 2022 मध्ये किती कोटी लोकांनी विमानतळावर प्रवास केला?

दरम्यान, 2022 मध्ये 6.6 कोटी प्रवासी या विमानतळावरुन प्रवास केला. या विमानतळावरुन मोठ्या संख्येने प्रवासी भारत, सौदी अरेबिया, ब्रिटन आणि पाकिस्तानला जातात. रशिया देखील एक मोठी बाजारपेठ आहे, कारण मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या आक्रमणादरम्यान दुबई हे रशियन लोकांसाठी खुले असलेल्या काही ठिकाणांपैकी एक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT