Earthquake
Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey-Syria Earthquake: तुर्कस्तान पुन्हा हादरले, 24 तासांत भूकंपाचा तिसरा धक्का

Manish Jadhav

Turkey-Syria Earthquake Today: तुर्कस्तानच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. 24 तासांत तिसऱ्यांदा तुर्कस्तान हादरले आहे. यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6 इतकी नोंदवली गेली. USGS ने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी सकाळी आलेल्या जोरदार भूकंपामुळे तुर्कस्तानचे मोठे नुकसान झाले. तिथे संध्याकाळी पुन्हा भूकंप झाला. आत्तापर्यंत सुमारे 1000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, तुर्कस्तानमध्ये सोमवारी सकाळी जोरदार भूकंप झाला. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. आफ्टरशॉक अजूनही जाणवत आहेत. विविध शहरांतील बचाव कर्मचारी आणि रहिवासी कोसळलेल्या इमारतींमधून वाचलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या रुग्णालयातून आणि सीरियातील इतर अनेक रुग्णालयांमधून (Hospital) नवजात बालकांसह रुग्णांना बाहेर काढावे लागले.

दुसरीकडे, अडाना शहरातील एका रहिवाशाने सांगितले की, आमच्या आजूबाजूच्या तीन इमारती कोसळल्या आहेत. दियारबाकीर या सुदूर पूर्वेकडील शहरात, बचाव कर्मचारी भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीतून वाचलेल्यांना स्ट्रेचरवर घेऊन जात आहेत. कैरोपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याचा केंद्रबिंदू सीरियाच्या (Syria) सीमेपासून 90 किमी अंतरावर असलेल्या गाझियानटेप शहराच्या उत्तरेला होता.

तसेच, भूकंप सीरियाच्या एका भागात झाला जिथे एक दशकाहून अधिक काळ गृहयुद्ध सुरु आहे. प्रभावित क्षेत्र सरकार आणि बंडखोरांमध्ये विभागले गेले आहे. त्याचवेळी, तुर्की प्रदेशातील संघर्षामुळे लाखो निर्वासित स्थायिक झाले आहेत. लढाईमुळे विस्थापित झालेले चार दशलक्ष लोक विरोधी-नियंत्रित सीरियन प्रदेशात राहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT