Hindu Temple Dainik Gomantak
ग्लोबल

Australia: ऑस्ट्रेलियात तिसऱ्यांदा हिंदू मंदिराची तोडफोड; भिंतींवर लिहिले, ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’चे नारे !

Hindu Temple: ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांची तोडफोड थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज म्हणजेच सोमवारी अशी घटना तिसऱ्यांदा समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Hindu Temples Destroye: ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांची तोडफोड थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज म्हणजेच सोमवारी अशी घटना तिसऱ्यांदा समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात पंधरा दिवसात तिसऱ्या मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. मेलबर्नच्या अल्बर्ट पार्कमधील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (इस्कॉन) मंदिराच्या व्यवस्थापनाने आज सकाळी या घटनेची माहिती दिली.

दरम्यान, मंदिर (Temple) परिसराची तोडफोड करण्यात आली असून भिंतींवर ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’चे नारे लिहिण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनांमागे खलिस्तानी समर्थकांचा हात असल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे, इस्कॉन मंदिराचे संचालक भक्त दास म्हणाले की, “आम्ही या घटनेने हैराण झालो आहोत. आमच्या प्रार्थनास्थळाचा हा अपमान आहे. याप्रकरणी व्हिक्टोरिया पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हेगारांचा शोध सुरु करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. यातून काही महत्त्वाचे संकेत मिळतील अशी अपेक्षा आहे.''

मंदिरावर भारतविरोधी गोष्टी लिहिल्या

यापूर्वी, 16 जानेवारी रोजी 'खलिस्तान समर्थकांनी' ऑस्ट्रेलियातील एका हिंदू मंदिरावर भारतविरोधी गोष्टी लिहून त्याचे नुकसान केले होते. आठवडाभरात व्हिक्टोरिया प्रांतातील मंदिराचे नुकसान होण्याची ही दुसरी घटना होती. तमिळ हिंदू समुदायाचा तीन दिवस चालणारा सण 'थाई पोंगल' या उत्सवासाठी भाविक मंदिरात गेले, तेव्हा मंदिराची तोडफोड उघडकीस आली.

लोक व्हिक्टोरिया पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत आहेत

फेडरल सदस्य जोश बर्न्स म्हणाले: 'आज अल्बर्ट पार्कमधील हरे कृष्ण मंदिरावर झालेल्या घृणास्पद हल्ल्याबद्दल मला धक्का बसला. मेलबर्नमधील हिंदू प्रार्थनास्थळांच्या तोडफोडीची अलीकडच्या आठवड्यात ही तिसरी घटना आहे.

त्याचवेळी, इस्कॉन मंदिराचे भक्त, शिवेश पांडे म्हणाले की, 'गेल्या 2 आठवड्यात शांतताप्रिय हिंदू समुदायाविरोधात द्वेषपूर्ण अजेंडा चालवणाऱ्यांविरोधात व्हिक्टोरिया पोलीस निर्णायक कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT