ग्लोबल

करोडो रूपयांची बेंटले कार लंडन मधून चोरून पाकिस्तानला पळवली

गोमन्तक डिजिटल टीम

ब्रिटनची राजधानी लंडन (Britain, London) येथून एक अजब गजब चोरीची बातमी समोर आली आहे. ब्रिटनची राजधानी लंडन येथून करोडो रूपयांची बेंटले कार (Bentley Car) चोरून पाकिस्तानला (Pakistan) पळवली आहे. या चोरीच्या घटनेत ब्रिटनमध्ये असलेल्या एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याचा देखील सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. 'बेंटले मुल्सेन' ही जगप्रसिद्ध सुपरकार आहे. ज्याची किंमत 02 कोटी 40 लाख एवढी आहे.

पाकिस्तानच्या कस्टम अधिकार्‍यांनी शनिवारी छापा टाकून कराचीतील एका बंगल्यातून ब्रिटनमधून चोरलेली 'बेंटले मुल्सेन' सेडान ही आलिशान कार जप्त केली. ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने कार चोरीला गेल्याची माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी बंगल्यावर छापा टाकून तेथून ही महागडी कार जप्त केली. दुसऱ्या एका बंगल्यातून विना परवाना शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

काही आठवड्यांपूर्वी लंडनमध्ये ही कार चोरीला गेल्याची माहिती समोर आली. या टोळीत सामील असलेल्या चोरांनी पूर्व युरोपीय देशातील एका उच्चपदस्थ राजनयिकाच्या कागदपत्रांचा वापर करून कार पाकिस्तानात आणली होती. या अधिकाऱ्याला आता त्यांच्या सरकारने माघारी बोलावले असल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT