Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: 'तुरुंगातच माझी हत्या करण्याचा डाव', इम्रान खान यांनी पुन्हा व्यक्त केली भीती

इम्रान खान यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Pramod Yadav

Imran Khan Cypher Case: सायफर प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. खान यांनी पाकिस्तान सोडण्यास नकार दिल्यामुळे तुरुंगात त्यांच्या हत्येचा आणखी एक प्रयत्न केला जाऊ शकतो, असा दावा केला आहे.

'मी देश सोडून जाणार नाही, त्यामुळे निश्चतच माझ्या जीवाला धोका आहे. तुरुंगात असताना माझा खून करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, हळूहळू विष देण्याचा प्रयत्न होऊ शकतो,' असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, इम्रान खाने पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि जर त्यांना अशक्तपणा जाणवत असेल तर कळेल. याआधीही मला दोनदा सार्वजनिकरित्या जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यापूर्वी पाकिस्तानी न्यायालयाने इम्रान खानचा जामीन अर्ज फेटाळला आणि सायफर प्रकरणातील पहिला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. तर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने माजी परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी यांना याच प्रकरणात दोषी ठरवले.

इम्रान खान यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे याचिकेत म्हटले आहे. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून, सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत मला तुरुंगात ठेवण्यासाठी ही सर्व प्रकरणे करण्यात आली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, त्यांनी देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत त्याची चेष्टा करण्यात आल्याचे सांगितले. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावरही त्यांनी आरोपांचा पुनरुच्चार केला. शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला क्लीन चिट देऊन राजकारणात आणणे कितपत योग्य आहे, असे ते म्हणाले.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सायफर प्रकरणात रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत. इम्रान खान यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये सायफर प्रकरणात अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT