Michael Kenneth Williams Dainik Gomantak
ग्लोबल

मायकल के विल्यम्सच्या मृत्यू प्रकरणी चौघांविरुद्ध याचिका दाखल

विल्यम्स, ज्याने मोठ्या प्रमाणावर प्रशंसनीय टेलिव्हिजन मालिकेत ओमर लिटल म्हणून काम केले होते, त्यांचा सप्टेंबरमध्ये अमली पदार्थांच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

न्यूयॉर्कच्या वकिलांनी बुधवारी सांगितले की त्यांनी "द वायर" अमेरिकन ड्रामा सिरीज (American Drama Series) मधील अभिनेता मायकेल के. विल्यम्सच्या (Michael Kenneth Williams) अमली पदार्थ ओव्हरडोजच्या सेवनामुळे मृत्यूच्या संबंधात चार जणांवरती आरोप केले आहेत. विल्यम्स, ज्याने मोठ्या प्रमाणावर प्रशंसनीय टेलिव्हिजन (Television) मालिकेत ओमर लिटल म्हणून काम केले होते, त्यांचा सप्टेंबरमध्ये अमली पदार्थांच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू झाला आहे.

ग्राउंडब्रेकिंग शोमध्ये प्रतिष्ठित बाल्टिमोर स्टिक-अप मॅनची भूमिका करणारा 54 वर्षीय मायकेल के. विल्यम्स, न्यूयॉर्कमधील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. न्यू यॉर्कच्या (New York) दक्षिणी जिल्ह्याच्या युनायटेड स्टेट्स अॅटर्नीने एका निवेदनात म्हटले आहे की, विल्यम्सची हत्या करणाऱ्या फेंटॅनाइल-लेस्ड हेरॉइनचे वितरण करण्याचा कट रचल्याचा आरोप या चौघांवरती करण्यात आला आहे.

इर्विन कार्टाजेना, हेक्टर रॉबल्स, लुईस क्रूझ आणि कार्लोस मॅकी अश्या या चार जनांवरती याचीका दाखल करण्यात आली आहे. कार्टाजेनाने प्राणघातक डोसची विक्री केली होती, असे वकील डॅमियन विल्यम्स यांनी सांगितले. त्याला किमान 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि दोषी ठरल्यास जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते असे त्यांनी त्यावेळी सांगितले.

एमी-नामांकित (Primetime Emmy Awards) अभिनेत्याचा मृत्यू "अमली पदार्थांच्या एकत्रित सेवनाच्या परिणामांमुळे तीव्र नशा झाली," असं न्यूयॉर्कच्या मुख्य वैद्यकीय परीक्षकांनी निर्णय दिला आहे. "द वायर" मधील त्याच्या भूमिकेसाठी विल्यम्सचे कौतुक करण्यात आले होते, ज्यामध्ये त्याने एका समलिंगी (Gay) सशस्त्र दरोडेखोराची भूमिका केली होती जो ड्रग डीलर्सना पकडण्यात माहिर होता.

HBO मालिका "बोर्डवॉक एम्पायर" मधील अल्बर्ट 'चॉकी' व्हाईटच्या भूमिकेसाठीही तो प्रसिद्ध होता. या अभिनेत्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागल्याचा खुलासा त्याने स्वत: केला होता, यूएस मीडियाला सांगितले होते की त्याने "द वायर" मधून कमाईचा बराचसा भाग अंमली पदार्थांवर खर्च केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT