Egypt Dainik Gomantak
ग्लोबल

इजिप्तला मोठा झटका, अमेरिकेने रोखली 130 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांच्या प्रशासनाने मानवाधिकारांच्या चिंतेमुळे (Human Rights) इजिप्तला देण्यात येणारी 130 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत (Military Aid) रोखली आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांच्या प्रशासनाने मानवाधिकारांच्या चिंतेमुळे (Human Rights) इजिप्तला देण्यात येणारी 130 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत (Military Aid) रोखली आहे. या घोषणेच्या काही दिवसांपूर्वी, अमेरिकन प्रशासनाने इजिप्तला $2.5 अब्ज शस्त्रास्त्रे विकण्यास मान्यता दिली होती.मात्र परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, इजिप्तने (Egypt) 130 दशलक्ष डॉलर्सची लष्करी आर्थिक मदत मिळवण्याच्या अटी पूर्ण केल्या नाहीत. इजिप्तसाठी राखून ठेवलेली ही रक्कम सप्टेंबरपासून रोखून धरण्यात आली होती. (The US Suspends 130 130 Million In Military Aid To Egypt Over Human Rights Concerns)

दरम्यान, ही रक्कम आता इतर कार्यक्रमांसाठी राखून ठेवली जावी, असे मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र त्यांनी याबद्दल तपशीलवार माहिती दिलेली नाही (US Military Aid to Egypt). मात्र इजिप्तला 2.5 अब्ज डॉलर्समध्ये लष्करी वाहतूक विमाने आणि रडार यंत्रणा विकल्याचा उल्लेख मंत्रालयाने यामध्ये केलेला नाही. त्यांनी मंगळवारी या विक्रीला मंजुरी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी गुरुवारी त्यांच्या इजिप्शियन समकक्षांशी फोनवरुन संवाद साधला. ज्यामध्ये मानवाधिकाराच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. आता रविवारपर्यंत या प्रकरणी निर्णय होऊ शकतो.

30 जानेवारीची मुदत देण्यात आली होती

इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याकडून या प्रकरणी अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. इजिप्शियन अधिकाऱ्यांना 30 जानेवारीची मुदत देण्यात आली होती. ज्यामध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या सरकारला अनेक अटी पूर्ण करण्यासही सांगण्यात आले आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटने या अटींचे मात्र तपशीलवार स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यात केस 173 नावाच्या एका प्रकरणाचाही समावेश आहे, ज्यामध्ये नागरी समाजाच्या वकिलांच्या प्रदीर्घ खटल्याला थांबवण्याचा आणि 16 व्यक्तींवरील आरोप रद्द करण्याचा समावेश आहे.

संबंध प्रभावित होऊ शकतात

अमेरिका (America) दरवर्षी इजिप्तला एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त लष्करी मदत देत आहे. मात्र सध्याचा निर्णय अमेरिकन नेते आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दबावाखाली घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT