Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेमुळं आडलंय तालिबान्यांच सत्ता स्थापनेचं घोडं

"अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) एकही अमेरिकन सैनिक उपस्थित होईपर्यंत सरकार आणि मंत्रिमंडळाच्या स्थापनेची घोषणा केली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे."

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) आपले सरकार स्थापन करण्याबाबत एक मोठे निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका सैन्य (U.S. Military) पूर्णपणे माघार घेत नाही, तोपर्यंत सरकार स्थापनेची घोषणा करणार नाही. एएफपी या वृत्तसंस्थेने दोन तालिबानी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. तालिबानच्या एका सूत्राने सांगितले की, "अफगाणिस्तानमध्ये एकही अमेरिकन सैनिक उपस्थित होईपर्यंत सरकार आणि मंत्रिमंडळाच्या स्थापनेची घोषणा केली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे." यानंतर, संघटनेशी संबंधित अन्य एका सूत्राने या वृत्ताला दुजोरा दिला.

काही तासांपूर्वी तालिबानने अमेरिकेला धमकी दिली होती आणि म्हटले होते की, जर 31 तारखेपर्यंत सर्व सैन्य न सोडले तर त्याचे 'गंभीर परिणाम' होतील (Taliban Threat to US). संघटनेचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी ब्रिटिश संकेतस्थळाशी केलेल्या संभाषणात सांगितले, 'ही एक लाल रेषा आहे. राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटले आहे की, 31 ऑगस्टपर्यंत सर्व लष्करी दले मागे घेतली जातील. त्यामुळे जर त्यांनी ही मुदत वाढवली तर याचा अर्थ असा होईल की जेव्हा गरज नसताना ते आपले वर्चस्व वाढवत आहेत.'

अविश्वास असेल - शाहीन

शाहीन म्हणाले, 'अमेरिका किंवा ब्रिटनला स्थलांतर सुरु ठेवण्यासाठी अतिरिक्त वेळ मागावा लागला तर - उत्तर अद्याप नाही असे आहे. किंवा त्याचे भयंकर परिणाम होतील. यामुळे आमच्यामध्ये अविश्वास निर्माण होईल. जर त्यांचे वर्चस्व चालू ठेवण्याचा हेतू असेल तर ते एक प्रतिक्रिया भडकवेल. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना मुदत वाढवण्यास सांगू शकतात. जेणेकरुन अधिकाधिक लोकांना देशाबाहेर काढता येईल.

काबूल विमानतळावर अराजक

दुसरीकडे, काबूल विमानतळावरील (Kabul Airport) परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मोठ्या संख्येने अफगाणी देश सोडून पळून जात आहेत, यामुळे येथे खूप गर्दी आहे. अमेरिका आणि इतर देशांनाही त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. सुहेल शाहीन यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, यामागचे कारण तालिबान नसून आर्थिक समस्या आहे. तो म्हणाला, 'मी तुम्हाला खात्री देतो की, कोणालाही काळजी करण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. हे लोक पाश्चिमात्य देशांमध्ये जात आहेत आणि हा एक प्रकारचा आर्थिक विस्थापन आहे कारण अफगाणिस्तान हा एक गरीब देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT