Sri Lanka News, Sri Lanka fuel crisis News, Sri Lanka economic crisis News Dainik Gomantak
ग्लोबल

श्रीलंकेत इंधन संकटाचा भडका, ​​पेट्रोल-गॅस स्टेशनवर लष्कर तैनात

श्रीलंकेतील (Sri Lanka) जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेतील जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन गरजांसाठी श्रीलंकेतील जनता आता रस्त्यावर उतरु लागली आहे. दुससरीकडे मात्र आंदोलकर्त्या जनतेला दडपण्यासाठी पेट्रोल आणि गॅस स्टेशनवर सैन्य तैनात करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे श्रीलंकेत (Sri Lanka) सात दशकांतील सर्वात मोठी आर्थिक मंदी आली आहे. ज्यामध्ये जिवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. (The Sri Lankan government has ordered the deployment of troops at petrol and gas stations)

दरम्यान, सरकारचे प्रवक्ते रमेश पाथिराना (Ramesh Pathirana) म्हणाले, ''संतप्त जमावाने कोलंबोमधील मुख्य रस्ता रोखला. सोमवारी रॉकेल खरेदी करता न आल्याने वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर सैन्य तैनात करण्यात आले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फुटेजमध्ये संतप्त महिलांचा एक गट निषेध करताना दिसत आहे. त्यांनी रॉकेलच्या कमतरतेचा निषेध करण्यासाठी पर्यटक कोचला रोखले.'' (Sri Lanka fuel crisis news)

पाथीराना यांनी पत्रकारांशी बोलताना पुढे सांगितले की, ''पर्यटकांना थांबवले जात असल्याचे आम्ही पाहिले आहे. आम्ही असेही ऐकत आहोत की काही लोक तेलाचा साठा करत आहेत. आणि त्यामुळेच सरकारने कोलंबोबाहेर पेट्रोल आणि गॅस स्टेशनवर लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. लांबच्या लांब रांगेत जागेवरुन झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने मोटारसायकलस्वाराला भोसकून ठार केले. त्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले.''

शिवाय, संरक्षण अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितले की, 'रांगा जसजशा वाढत जात आहेत, तसतसे लोक संतप्त होत आहेत." रात्रीच्या वेळी पोलिसांसह लष्कराला बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी सांगितले की, तीन वृद्धांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. शनिवारपासून इंधनासाठी रांगा लागत आहेत. अनेक पेट्रोल स्टेशनवर लोक डिझेल (Diesel) आणि पेट्रोल (Petrol) घेण्यासाठी रात्रभर तळ ठोकून असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT