Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

इम्रान खान यांच्यावर चालणार देशद्रोहाचा खटला! पंतप्रधान शाहबाज शरीफ अ‍ॅक्शन मोडमध्ये

पाकिस्तान सरकार माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि गिलगिट-बाल्टीस्तान आणि खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा खटला सुरु करण्याबाबत चर्चा करत आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान सरकार माजी पंतप्रधान इम्रान खान, गिलगिट-बाल्टीस्तान आणि खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा खटला सुरु करण्याबाबत चर्चा करत आहे. गेल्या महिन्यात सरकारवर हल्ला करण्याच्या कथित योजनेवरुन शाहबाज शरीफ सरकारने हे पाऊल उचलले आहे. (The Shehbaz Sharif government is considering prosecuting Imran Khan for treason)

दरम्यान, गुरुवारी गृहमंत्री राणा सनाउल्ला खान यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या विशेष समितीची बैठक पार पडली. यामध्ये खान आणि इतरांवर त्यांच्या स्वातंत्र्य मोर्चासाठी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या मते, स्वातंत्र्य मोर्चाने इस्लामाबादला विनाशाच्या मार्गावर आणले होते.

तसेच, या मोर्चाचा एक भाग म्हणून, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे कार्यकर्ते आणि समर्थक 25 मे रोजी इस्लामाबादला पोहोचणार होते. यामध्ये ते निवडणुकांच्या मागणीसाठी आंदोलन करणार होते. मात्र आंदोलक आणि पोलिसांमधील चकमकीच्या घटनांमुळे मोर्चा आपल्या उद्देशात यशस्वी झाला नाही.

सरकारला मार्च महिन्यात मालमत्तेच्या हानीवर कारवाई करायची आहे

दरम्यान, सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी इम्रान खान आणि इतरांवर कारवाई करण्याच्या पर्यायांवर सरकार चर्चा करत आहे. माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या विशेष समितीला पीटीआयच्या मोर्चाबद्दल आणि सरकारवर हल्ला करण्याच्या औपचारिक योजनेबद्दल माहिती देण्यात आली. मंत्रिमंडळ समितीने पीटीआयचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) नियाझी आणि खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान आणि गिलगिट बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री खालिद खुर्शीद यांच्यावर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 124A अंतर्गत देशद्रोहाचा खटला सुरु करण्याबाबत चर्चा केली.

चीन पुन्हा पाकिस्तानला 2.3 अब्ज डॉलरची आर्थिक मदत करणार

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला (Pakistan) चीनने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी गुरुवारी सांगितले की, चीनी बँकांनी पाकिस्तानला $2.3 अब्ज देण्यास सहमती दर्शविली आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा परकीय चलन साठा वाढेल.

इस्माईल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, चीनी बँकांकडून सुमारे 2.3 अब्ज डॉलर्सच्या ठेवींचे पुनर्वित्त करण्यासाठी अटी आणि शर्ती मान्य केल्या आहेत. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, 6 मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $190 दशलक्षने घसरुन $10.308 अब्ज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT