Airplane  Dainik Gomantak
ग्लोबल

प्रवाशाने चालत्या विमानातून मारली उडी! जाणून घ्या काय घडलं

अमेरिकेतील (America) लॉस एंजेलिस (Los Angeles) विमातळावरुन आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. एका प्रवाशाने चालत्या विमानातून उडी मारली आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेतील (America) लॉस एंजेलिस (Los Angeles) विमातळावरुन आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. एका प्रवाशाने चालत्या विमानातून उडी मारली आहे. या प्रकारानंतर प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला तडक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. संध्याकाळी सात वाजता युनायटेड एक्सप्रेस (United Express) हे विमान साल्ट लेक सिटीसाठी (Salt Lake City) प्रयाण करत होते. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली.

सुरुवातीला या प्रवाशाने कॉकपीटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तो सर्व्हिस डोअर उघडण्यामध्येही यशस्वी झाला आणि त्याने तिथूनच उडी मारली. विमातळावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यामध्ये घेतले. प्रवाशाने उडी मारल्याने काही जखमाही झाल्या होत्या. त्यामुळे त्याला रुग्णालयामध्ये दाखल केले.

या धक्कादायक घटनेनंतर हे विमान परत आले आणि तीन तासांपर्यंत या विमानाला प्रयाण करण्याची परवानगी देण्यात आली नाही. मागील दोन दिवसातील या विमानाच्या प्रयाणामधील दुसरा अडथळा आहे. मागील गुरुवारीदेखील विमानतळावर अशाच प्रकारचा अडथळा निर्माण झाला होता. आपल्या मालवाहू गाडीसह एक व्यक्ती रनवे ओलांडत होता.

मात्र पोलिसांनी त्वरीत या गाडीचा चालक आणि गाडी या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे ही दुर्घटना टळली होती. त्यानंतर दोन रनवे बंद करण्यात आले होते. कोविड प्रतिबंधासाठी (Covid19) विमानामध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र या नियमांचं उल्लंघन केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा प्रवाशांवर कठोर कारवाई केली जात आहे. मात्र या नियमांचे पालन न करणारे प्रवासी रागामधून विमानातून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असे विमानतळ प्रशानाकडून (From Airport Administration) सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT