Russia denies claims of death of President Vladimir Putin. Dainik Gomantak
ग्लोबल

Vladimir Putin यांचा खरचं मृत्यू झाला आहे का? रशियाने जाहीर केली अधिकृत माहिती

Kremlin Putins Death Reports: जनरल SVR अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, पुतिन यांच्या मृतदेहासह खोलीत असलेल्या डॉक्टरांना दिमित्री कोचेनेव्ह यांच्या वैयक्तिक आदेशानुसार राष्ट्रपती सुरक्षा सेवेच्या सदस्यांनी खोलीतच रोखले आहे.

Ashutosh Masgaunde

The Kremlin, the official residence of Russia's president, has denied claims that President Vladimir Putin is dead:

रशियाच्या अध्यक्षांचे सरकारी निवासस्थान असलेल्या क्रेमलिनने अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूचे दावे फेटाळले आहेत.

पुतीन यांच्या मृत्यूच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना क्रेमलिनने पुतीन यांचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले आहे. ते पूर्वी होते तसेच आजही आहेत. नुकतेच काही प्रसार माध्यमांनी दावा केला होता की, वालदाई पॅलेसमध्ये ७१ वर्षीय पुतिन यांचे निधन झाले आहे.

पुतिन यांचा मृत्यू झाल्याचा दावा पहिल्यांदा एका टेलिग्राम चॅनलवर करण्यात आला होता. पुतिन यांचे मॉस्कोच्या उत्तरेकडील वलदाई पॅलेसमध्ये निधन झाल्याचे दावे करण्यात आले होते.

जनरल SVR टेलिग्राम चॅनलवर एक मेसेज प्रसिद्ध झाला होता. त्याममध्ये असे म्हटले होते की, "लक्ष द्या! रशियामध्ये सध्या सत्तापालटाचा प्रयत्न सुरू आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूला डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे."

जनरल SVR अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, "पुतिन यांच्या मृतदेहासह खोलीत असलेल्या डॉक्टरांना दिमित्री कोचेनेव्ह यांच्या वैयक्तिक आदेशानुसार राष्ट्रपती सुरक्षा सेवेच्या सदस्यांनी रोखून धरले आहे.

दुसरीकडे, या वृत्ताचा इन्कार करत पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सरकारी मीडिया आरआयए नोवोस्तीला सांगितले की, हा अहवाल केवळ अफवा आहे.

काही दिवसांपूर्वी पेस्कोव्ह यांना पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा करणाऱ्या अफवांचे खंडन करावे लागले होते. पुतिन यांच्या बॉडी डबलची अफवाही त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावली.

बॉडी डबलच्या दाव्यांवर पुतिनचे प्रवक्ते पेस्कोव्ह म्हणाले की, तुम्ही ऐकले असेल की, पुतिन यांच्याकडे अनेक बॉडी डबल्स आहेत, जे बंकरमध्ये त्यांच्या जागी काम करतात. हे देखील पूर्णपणे निराधार आहे, आमचे राष्ट्रपती पूर्वीसारखेच आहेत. ते 'मेगा एक्टिव्ह' आहेत.

जनरल SVR म्हणजे काय?

जनरल SVR एक वादग्रस्त चॅनल आहे, जे कथितपणे माजी क्रेमलिन लेफ्टनंट जनरल व्हिक्टर मिखाइलोविच चालवत आहेत.

जनरल एसव्हीआर यांनी त्यांच्या अहवालात पुतिन यांना कर्करोगाने ग्रासले होते आणि ते बऱ्याच काळापासून आजारी असल्याचा दावा केला होता.

याच अहवालात पुतिन बॉडी डबल वापरतात असा दावाही करण्यात आला होता. यापूर्वी, युक्रेनचे लष्करी गुप्तचर प्रमुख लेफ्टनंट-जनरल किरिल बुडानोव्ह यांनी धक्कादायक दावा केला होता की, जून 2022 पासून खरे पुतिन दिसले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT