Japan PM Fumio Kishida with son Shotara Kishida  Google Image
ग्लोबल

Fumio Kishida: जपानच्या पंतप्रधानांनी मुलाला सचिव पदावरून हटवले; माफीही मागितली... वाचा नेमके प्रकरण

मुलाने फ्रान्समध्ये वापरली होती वडीलांची सरकारी कार

Akshay Nirmale

Japan PM Fumio Kishida: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी त्यांचा मोठा मुलगा शोतारो किशिदा याला त्यांच्या राजकीय सचिव पदावरून हटवले आहे. मुलाविरोधात विविध आरोप झाल्यानंतर किशिदा यांनी हा निर्णय घेतला आहे. मुलाच्या कृत्यांबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे.

गेल्या वर्षी, शोतारोने त्याच्या वडिलांच्या अधिकृत निवासस्थानी मित्र आणि नातेवाईकांसोबत काही छायाचित्रे काढली होती. याशिवाय शोतारोवर फ्रान्समध्ये वडिलांची सरकारी कार वापरल्याचाही आरोप आहे.

यातील एका छायाचित्रात शोतारा पायऱ्यांवर दिसतो. हा फोटो व्हायरल झाला होता आणि पंतप्रधानांच्या पक्षाच्या नेत्यांनी हे चुकीचे असल्याचे म्हटले होते. नंतर मुलाच्या कृत्याबद्दल माफी मागताना फुमिओ यांनी जबाबदारी स्वीकारली होती.

सोमवारी शोतारो यांच्यावर कारवाई करताना फुमिओ यांनी शोतारो यांना त्यांच्या राजकीय सचिव पदावरून हटवले.

जपानमध्ये नेते आणि त्यांच्या कुटुंबियांची वागणूक खूप महत्त्वाची आहे. प्रथमदर्शनी, शोतारोने काढलेल्या छायाचित्रांमध्ये काहीही चुकीचे नाही, असे वाटते. वडिलांच्या शासकीय निवासस्थानाच्या पायऱ्यांवर त्यांनी फोटोसाठी पोझ दिली होती. या पायऱ्यांवर लाल गालिचा अंथरला होता.

दुसऱ्या एका फोटोत तो मित्रांसोबत दिसत होता. हे सर्व फोटो डिसेंबरमध्ये झालेल्या इयर एंड पार्टीचे आहेत.

पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाविषयी सर्वत्र आदर आहे. त्यामुळे शोतारोचे हे कृत्य म्हणजे पंतप्रधानपदाचाही अपमान आहे, अशी प्रतिक्रिया जपानमध्ये व्यक्त होत होती. सुरुवातीला सरकारने हे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केला. पण नंतर आंदोलन आणखी तीव्र झाले.

हे प्रकरण वाढत असतानाच सोमवारी फ्युमिओ यांनी मीडियासमोर हजर झाला. ते म्हणाले, मुलाने केलेल्या कृत्याची जबाबदारी मी घेतो. लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. मी हे प्रकरण टाळू शकत नाही. नुकतीच हिरोशिमा येथे G-7 देशांच्या नेत्यांची बैठक झाली.

त्यानंतरच मी ठरवले होते की शोतारो यापुढे या पदावर राहाणार नाहीत. आता ही जबाबदारी मी माझ्या पर्सनल सेक्रेटरीकडे देत आहे.

फेब्रुवारीमध्ये जपानचे पंतप्रधान फ्रान्स, ब्रिटन आणि कॅनडाच्या दौऱ्यावर गेले होते. या भेटीत शोतारोही वडिलांसोबत होता. शोतारो फ्रान्समध्ये खरेदीसाठी गेला आणि वडिलांची सरकारी कार वापरली होती. तेव्हाही शोतारो यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला होता.

मात्र, राजकीय सचिव म्हणून ते वडिलांसोबत गेले होते आणि खरेदी करणे चुकीचे नसल्याचे सांगत सरकारने त्यांचा बचाव केला.

ऑक्टोबरमध्ये किशिदा यांनी आपल्या मुलाला राजकीय सचिव म्हणून नियुक्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT